West Indies vs India 5th T20I : टीम इंडियाला दिग्गज कॅप्टन्सचा वारसा लाभलाय. ज्यामुळे कपिल देवपासून ते महेंद्रसिंह धोनीचा समावेश होतो. त्यानंतर विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्माचं (Rohit Sharma) नाव घेतलं तरी वावगं ठरणार नाही. मात्र, रोहितनंतर कोण? असा सवाल विचारला जात असताना आता हार्दिक पांड्याचं (Hardik Pandya) नाव समोर येतंय. मात्र, हार्दिक पांड्याने टीम इंडियाची नाचक्की केल्याचं पहायला मिळतंय. नुकत्याच झालेल्या भारत आणि वेस्ट इंडिज (WI vs IND T20 Series) यांच्यातील सामन्यात हार्दिकने 17 वर्षांचा नकोसा रेकॉर्ड नावावर केला आहे. त्यामुळे हार्दिक पांड्या सोशल मीडियावर ट्रोल होत असल्याचं पहायला मिळतंय.
भारताने यजमान वेस्ट इंडिजविरुद्धची मालिका 3-2 ने गमावली. त्याचबरोबर गेल्या 17 वर्षाच पहिल्यांदाच टीम इंडियाला सिरीजमध्ये पराभवाचं तोंड पहावं लागत आहे. 17 वर्षानंतर वेस्ट इंडीजकडून मालिका गमावणारा हार्दिक पांड्या हा भारताचा पहिला खेळाडू ठरला आहे. त्यामुळे हार्दिक पांड्यावर मोठ्या प्रमाणात टीका होताना दिसते. मात्र, पाचवा सामन्यात पराभवाचं तोंड पहायला लागल्यावर हार्दिकने जबाबदारी स्विकारली आहे.
मी आलो तेव्हा आम्ही सामन्यातील गती गमावली आणि परिस्थितीचा फायदा घेऊ शकलो नाही. मला विश्वास आहे की, आगामी काळात आम्ही स्वतःला आव्हान देऊ, असं हार्दिक पांड्या म्हणाला आहे. आम्हाला जास्त स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. टीममधील मुलं कशी आहेत हे मला माहीत आहे. मला एखादी परिस्थिती दिसली, तर मी साधारणपणे मनात येणार्या गोष्टीला प्राधान्य देतो. रॉकेट सायन्स नाही, फक्त माझ्या मनातील भावना असते, असं हार्दिक पांड्या म्हणतो.
एखादा तरुण खेळाडू येतो आणि तो वर हात करतो, हे मला आवडत नाही. प्रत्येक खेळाडूने त्यांच्यातील टॅलेन्ट दाखवायला हवं, असं हार्दिक पांड्या म्हणतो. येत्या काळात टी-ट्वेंटी वर्ल्ड कप येत आहे. त्यावेळी आम्ही सर्व खेळाडू मोठ्या तयारीनिशी मैदानात उतरू, असंही हार्दिक पांड्या म्हणाला आहे.
आणखी वाचा - WI vs IND 2023: भारतासमोर वेस्ट इंडिज 'किंग'; टीम इंडियाने मालिका 3-2 ने गमावली!
दरम्यान, सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) अर्धशतकाच्या जोरावर भारताने वेस्ट इंडीजसमोर ठेवले 166 धावांचं आव्हान ठेवलं होतं. त्यानंतर वेस्ट इंडिजने दोन ओव्हर बाकी असताना सामना खिशात घातला. वेस्ट इंडिजकडून ब्रँडन किंगने 85 धावांची वादळी खेळी केली. त्यामुळे वर्ल्ड कपमधून बाहेर पडलेल्या वेस्ट इंडिजने वर्ल्ड कप जिंकण्याची स्वप्न पाहणाऱ्या भारताला हरवलं आहे.