मुंबई : सनरायझर्स हैदराबादने गुजरातला 8 विकेट्सने पराभव केला. गुजरात टीमचा पहिला पराभव आहे. हैदराबादने चांगल्या पद्धतीनं फलंदाजी केली. या मॅचमध्ये हार्दिक पांड्या मोहम्मद शमीवर चिडलेला दिसला. मोहम्मद शमी आणि पांड्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मॅचमध्ये हार्दिक पांड्याने आपल्या फलंदाजीनं सर्वांनाच हैराण केलं. हार्दिक पांड्याने 4 ओव्हरमध्ये 27 धावा दिल्या. केन विल्यमसननं खूप धावा केल्या. 13 व्या ओव्हरमध्ये हार्दिक पांड्या गोलंदाजीसाठी उतरला. तेव्हा दुसऱ्या आणि तिसऱ्या बॉलवर केननं षटकार मारला.
पाचव्या बॉलवर राहुल त्रिपाठीने बाउंड्रीजवळ लांब शॉट खेळला. तिथे फिल्डिंगसाठी उभ्या असलेल्या मोहम्मद शमीने कॅच सोडला त्यामुळे हार्दिक पांड्या त्याच्यावर खूप संतापला.
ऑलराऊंडर खेळाडू हार्दिक पंड्या टी 20 वर्ल्ड कप 2021 पासून टीम इंडियामधून बाहेर आहे. अशा परिस्थितीत त्याला आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करून टीम इंडियामध्ये परतण्याची संधी आहे.
आयपीएल 2022 च्या चार सामन्यांमध्ये त्याने 141 धावा केल्या आणि 3 विकेट्सही घेतल्या आहेत. गुजरातच्या विजयात त्याचा मोलाचा वाटा आहे.
— Rishobpuant (@rishobpuant) April 11, 2022
हैदराबाद टीमने सामना जिंकला आहे. पहिल्यांदा केननं टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतला. गुजरातने 162 धावा केल्या. हार्दिक पांड्याने अर्धशतक केलं. मॅथ्यू वेडने 19 आणि डेव्हिड मिलरने 12 केल्या.
हैदराबादकडून भुवनेश्वर कुमार आणि टी नटराजन यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. त्याचवेळी उमरान मलिक आणि मार्को जेसनने 1-1 विकेट घेतली. हैदराबादसाठी केन विल्यमसनने शानदार अर्धशतक झळकावले. त्याने 57 धावांची खेळी खेळली.