Hardik Pandya Angry: भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यामध्ये पहिला वनडे (India vs Australia 1st ODI) सामना खेळवण्यात येतोय. वनडे सिरीजच्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा (Team India) नियमित कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) अनुपस्थितीत आहे. त्यामुळे केवळ पहिल्या सामन्याची धुरा हार्दिक पंड्याकडे सोपवण्यात आली आहे. मात्र यावेळी मैदानात कर्णधार हार्दिक पंड्याचा (Hardik Pandya) रूद्र अवतार पहायला मिळाला आहे.
भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यात हार्दिक पंड्याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. यावेळी ऑस्ट्रेलिया फलंदाजी करत असताना एक अशी घटना घडली ज्यामुळे कर्णधार हार्दिक पंड्या चांगलाच संतापला होता.
ऑस्ट्रेलियाची टीम फलंदाजी करत असताना सातव्या ओव्हरमध्ये ही घटना घडली. यावेळी हार्दिक पंड्यासमोर मिचेल मार्श फलंदाजी करत होता. पंड्या त्याच्या ओव्हरचा तिसरा बॉल टाकण्यासाठी धावला, मात्र याचवेळी फलंदाजाने त्याला बॉल टाकण्यासापासून रोखलं.
यावेळी मिचेल मार्शला साईट स्क्रिनकडून काहीतरी हालचाली होताना दिसला. यामुळे तो खेळावर कॉन्सट्रेट करू शकला नाही. याच घटनेमुळे गोलंदाज हार्दिक पंड्या चांगलाच संतापला.
ही घटना घडल्यानंतर हार्दिक पंड्याने रागाच्या भरात अंपायरला याची माहिती दिली. साईट स्क्रिनकडे इशारे करत तो अंपायरला याबाबत सांगत होता. यावेळी तो चांगलाच संतापलेला दिसत होता.
— Guess Karo (@KuchNahiUkhada) March 17, 2023
ऑस्ट्रेलिया टीमने प्रथम फलंदाजी करत 35.4 ओव्हरमध्ये 188 रन्स केले. टीम इंडियाच्या भेदक गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियाची टीम अक्षरशः ढेपाळली. भारताकडून मोहम्मद शमी सर्वात किफायतशीर गोलंदाज ठरला. त्याने 6 ओव्हर्समध्ये केवळ 17 रन्स दिले. त्याने 3 विकेट्स देखील काढले असून 2 मेडन ओव्हर टाकल्या.
शुभमन गिल, इशान किशन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (कर्णधार), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक
ट्रेविस हेड, मिचेल मार्श, स्टीव स्मिथ (कर्णधार), मार्नस लाबुशेन, जोश इंग्लिश (विकेटकीपर), कॅमरन ग्रीन, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टोयनिस, सीन एबोट, मिचेल स्टार्क आणि एडम जांपा.