भारतीय गोलंदाजांची चांगली कामगिरी, भारतीय संघाला विजयासाठी 420 रनची गरज

भारत आणि इंग्लंड यांच्यात चार सामन्यांच्या कसोटी मालिकेचा पहिला सामना चेपक चेडियम चेन्नई येथे खेळला जात आहे.

Updated: Feb 8, 2021, 04:24 PM IST
भारतीय गोलंदाजांची चांगली कामगिरी, भारतीय संघाला विजयासाठी 420 रनची गरज title=

चेन्नई : भारत आणि इंग्लंड यांच्यात चार सामन्यांच्या कसोटी मालिकेचा पहिला सामना चेपक चेडियम चेन्नई येथे खेळला जात आहे. आज, सामन्याच्या चौथ्या दिवशी भारतीय संघाने 257/6 पुढे खेळण्यास सुरुवात केली. भारतीय संघाने पहिल्या डावात 95.5ओव्हरमध्ये 337 धावा केल्या. 241 धावांच्या आघाडीनंतर चौथ्या दिवशी इंग्लंडचा संघ 178 रनवर ऑलआऊट झाला. त्यामुळे आता भारताला विजयासाठी 420 रनची आवश्यकता आहे.

चेन्नई टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये इंग्लंडची टॉप ऑर्डर फ्लॉप ठरली. दुसऱ्या इनिंगमध्ये इंग्लंडच्या बॅट्समनना टीम इंडियाच्या बॉलर्सनी झटपट माघारी धाडले. इंग्लंडची टॉप ऑर्डर मोठी धावसंख्या उभरण्यात अपयशी ठरले.. भारताच्या आर.अश्विननं इंग्लंडच्या 3 खेळाडूंना माघारी धाडले... पहिल्या इनिंगमध्ये डबल सेंच्युरी करणारा कॅप्टन जो रुट अवघ्या 40 रन्समध्ये पॅव्हेलियनमध्ये परतला.. सध्या इंग्लंडकडे 360 रन्सची लीड आहे.. 

इंग्लंडचा दुसरा डाव

241 धावांची आघाडी मिळवल्यानंतर इंग्लंडचा संघ दुसर्‍या डावात फलंदाजीला आला, तेव्हा पहिला धक्का डावाच्या पहिल्याच चेंडूवर लागला. रोरी बर्न्सला आर अश्विनने त्याला आऊट केले. अश्विनला त्यानंतर दुसरं यशही मिळालं. 16 धावांवर त्याने डॉम सिब्लेला माघारी पाठवलं. इशांत शर्माने तिसरी विकेट घेतली. त्याने डॅनियल लॉरेन्सला 18 रनवर आऊट केले.

इंग्लंडला बेन स्टोक्सच्या रुपाने चौथा धक्का बसला. त्याने 7 धावा केल्या आणि त्याला आर अश्विनने आऊट केलं. पाचवं यश जो रूटच्या रुपात मिळालं. त्याने 32 बॉलमध्ये 40 धावा केल्या आणि जसप्रीत बुमराहने त्याची विकेट घेतली. इंग्लंडला सहावा धक्का ओली पोपच्या रुपात लागली. त्याला शाहबाज नदीमने 28 धावांवर आऊट केले.

इंग्लंडला सातवा धक्का जोस बटलरच्या रूपात लागला. त्याने 24 धावा केल्या. डोम बेसच्या रूपात भारताला आठवं यश मिळालं. त्याने २५ रन केले. त्यानंतर जोफ्रा आर्चरने 5 आणि जेम्स अँडरसन शुन्यावर आऊट झाला.