महेंद्रसिंह धोनीने माझे करिअर खराब केलं, प्रसिद्ध खेळाडूचा गंभीर आरोप

महेंद्रसिंह धोनीने नेमकं कोणत्या खेळाडूचं करिअर खराब केलंय, कोण आहे हा खेळाडू? 

Updated: Sep 15, 2022, 03:42 PM IST
 महेंद्रसिंह धोनीने माझे करिअर खराब केलं, प्रसिद्ध खेळाडूचा गंभीर आरोप  title=

मुंबई : टीम इंडियाचा (Team India) माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीवर (Mahendra Singh Dhoni) एका प्रसिद्ध खेळाडूने गंभीर आरोप केला आहे. महेंद्र सिंह धोनीने माझे करिअर खराब केल्याचा आरोप या खेळाडूने केला आहे. त्यामुळे या आरोपाची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान या खेळाडूने काही दिवसांपुर्वीचं क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्यामुळे धोनीवर आरोप करणार हा खेळाडू आहे तरी कोण याची चर्चा रंगलीय. (former team india player big allegation on mahendra singh dhoni team india t20 world cup) 

टीम इंडियातून (Team India)  सध्या खेळत असलेले अनेक खेळाडू आपल्या मुलाखतीत धोनीची प्रशंसा करताना दिसतात.धोनी  (Mahendra Singh Dhoni) दिलेल्या पाठबळामुळे व शिकवणीमुळे खेळाडू उत्कृष्ट खेळ करत असल्याचं उदाहरण नेहमी देत असतात. मात्र आता धोनीसोबत मैदानात खेळलेल्या एका खेळाडूने त्याच्यावर गंभीर आरोप केले आहेत.विशेष म्हणजे या खेळाडूने निवृत्तीनंतर हे आरोप केल्यानंतर त्याच्या आरोपाची चर्चा आहे.  

टीम इंडियाचा माजी खेळाडू ईश्वर पांडे (Ishwar pandey) याने, एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियामध्ये संधी न मिळाल्याचा आरोप केला आहे. तसेच धोनीने त्याच्यावर विश्वास दाखवला असता, तर त्याची कारकीर्द आज वेगळ्याच ठिकाणी गेली असती, असा खळबळजनक आरोप केला आहे. पांडे यांच्या आरोपावरून असं वाटतंय, जसं धोनीने त्याला संघात स्थान दिले नाही. आणि त्याच्या करिअरला ब्रेक बसलाय.

T20 World Cup: भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी निराशाजनक बातमी समोर!

ईश्वर पांडेने (Ishwar pandey) एका न्युज चॅनेलशी बोलताना सांगितले की, "महेंद्रसिंग धोनीने मला संधी दिली असती तर माझी कारकीर्द वेगळी असती. तेव्हा मी 23-24 वर्षांचा होतो आणि माझा फिटनेसही खूप चांगला होता. तेव्हा धोनी भाईने मला संधी दिली होती. टीम इंडियामध्ये संधी मिळाली असती तर मी माझ्या देशासाठी चांगली कामगिरी केली असती आणि माझी कारकीर्द खूप वेगळी असती, असे तो म्हणाला आहे. 

दरम्यान धोनी संदर्भात ईश्वर पांडेने (Ishwar pandey) केलेल्या आरोपानंतर आता क्रिकेट वर्तुळात याची चर्चा सुरू आहे. या वादात आता आणखीण काय प्रतिक्रिया समोर येतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.