FIFA WC 2022: फूटबॉल वर्ल्डकप स्पर्धेचा कतारपर्यंतचा प्रवास, जाणून घ्या विजेत्या संघाला किती कोटी मिळणार

FIFA World Cup 2022: यंदाचा फुटबॉल वर्ल्डकप कतारमध्ये होत आहे. फुटबॉल स्पर्धेचं आयोजन करणारा कतार हा पहिला मध्यपूर्वेतील देश आहे. यजमानपद मिळवणारा सर्वात लहान देश आहे. 

Updated: Nov 15, 2022, 06:01 PM IST
FIFA WC 2022: फूटबॉल वर्ल्डकप स्पर्धेचा कतारपर्यंतचा प्रवास, जाणून घ्या विजेत्या संघाला किती कोटी मिळणार title=

FIFA World Cup 2022: यंदाचा फुटबॉल वर्ल्डकप कतारमध्ये होत आहे. फुटबॉल स्पर्धेचं आयोजन करणारा कतार हा पहिला मध्यपूर्वेतील देश आहे. यजमानपद मिळवणारा सर्वात लहान देश आहे. फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेला (Football World Cup) 1930 पासून सुरुवात झाली असून आतापर्यंत 20 स्पर्धा झाल्या आहेत. यंदाच्या विश्वचषकात 32 संघांनी भाग घेतला असून 8 गटात साखळी फेरीचे सामने होणार आहेत. कतार (Qatar) हा विश्वचषक खेळणारा 80 वा संघ असणार आहे. कतारमधील लुसेल स्टेडियममध्ये फुटबॉलचा अंतिम सामना रंगणार आहे. या स्टेडियममध्ये 80 हजार प्रेक्षक बसू शकतात. या विश्वचषकात मेस्सीचा अर्जेंटिना सर्वात वयस्कर संघ म्हणून गणला जात आहे. या संघातील खेळाडूंचं सरासरी वय 27.7 इतकं आहे. तर युएसए हा सर्वात तरुण संघ असणार आहे. या संघातील खेळाडूंचं सरासरी वय 24.5 वर्षे आहे. 

फुटबॉल विजेत्या संघाला किती कोटी मिळणार

फिफा वर्ल्डकप विजेत्या संघाला 344 कोटी रुपये, तर उपविजेत्या संघाला 245 कोटी रुपये मिळतील. स्पर्धेतील तिसऱ्या क्रमांकाच्या संघाला 220 कोटी रुपये आणि चौथ्या क्रमांकाच्या संघाला 204 कोटी रुपये मिळतील. 5व्या ते 8व्या क्रमांकापर्यंतच्या संघांना प्रत्येकी 138 कोटी रुपये दिले जातील. 9व्या ते 16व्या क्रमांकापर्यंतच्या संघांना प्रत्येकी 106-106 कोटी रुपये दिले जातील. तर 17व्या ते 32व्या क्रमांकावर असलेल्या संघांना प्रत्येकी 74-74 कोटी रुपये दिले जातील.

FIFA WC 2022: भारतानं FIFA वर्ल्डकपमध्ये खेळण्यासाठी काय करावं? कसा होणार स्पर्धेसाठी क्वालिफाय

आतापर्यंत फक्त आठ देशांनी जेतेपदावर नाव कोरलं आहे. ब्राझीलने पाच वेळा, तर जर्मनी आणि इटलीने प्रत्येकी चार जेतेपदे पटकावली आहेत. अर्जेंटिना, फ्रान्स आणि उरुग्वेने प्रत्येकी दोनदा विश्वचषक जिंकला आहे, तर इंग्लंड आणि स्पेनने प्रत्येकी एकदा विश्वचषक जिंकला आहे. ब्राझीलनं सर्वाधिक वेळा म्हणजेच पाच वेळा जेतेपदावर नाव कोरलं आहे. 

फुटबॉल वर्ल्डकपमधील आठ गट आणि संघ

  • ग्रुप ए: कतार, इक्वाडोर, सेनेगल, नेदरलँड
  • ग्रुप बी: इंग्लंड, इराण, यूएसए, वेल्स
  • ग्रुप सी: अर्जेंटीना, सौदी अरब, मॅक्सिको, पोलँड
  • ग्रुप डी: फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, डेनमार्क, ट्यूनीशिया
  • ग्रुप ई: स्पेन, कोस्टारिका, जर्मनी, जापान
  • ग्रुप एफ: बेल्जियम, कॅनाडा, मोरक्को, क्रोएशिया
  • ग्रुप जी: ब्राझील, सर्बिया, स्वित्झरलँड, कॅमरून
  • ग्रुप एच: पोर्तगाल, घाना, उरुग्वे, दक्षिण कोरिया