FIFA World Cup: उपांत्य फेरीत अर्जेंटिनाच्या चक्रव्यूहात अशी फसली क्रोएशिया

Argentina Defeat Croatia: फीफा वर्ल्डकप 2022 स्पर्धेत अर्जेंटिनाचा संघ अंतिम फेरीत पोहोचला आहे. उपांत्य फेरीत क्रोएशियाला 3-0 ने पराभूत केलं. या सामन्यापूर्वी दोन्ही संघाने खास रणनिती आखली होती. कतारमध्ये क्रोएशिया संघाची कामगिरी चांगली राहिली आहे.  2018 वर्ल्डकपमध्येही संघ उपविजेता ठरला होता. मात्र यंदाच्या विश्वचषकात अर्जेंटिनाचं चक्रव्यूह भेदण्यात क्रोएशिया अपशय आलं. 

Updated: Dec 14, 2022, 07:01 PM IST
FIFA World Cup: उपांत्य फेरीत अर्जेंटिनाच्या चक्रव्यूहात अशी फसली क्रोएशिया title=

Fifa World Cup 2022 Argentina Defeat Croatia: फीफा वर्ल्डकप 2022 स्पर्धेत अर्जेंटिनाचा संघ अंतिम फेरीत पोहोचला आहे. उपांत्य फेरीत क्रोएशियाला 3-0 ने पराभूत केलं. या सामन्यापूर्वी दोन्ही संघाने खास रणनिती आखली होती. कतारमध्ये क्रोएशिया संघाची कामगिरी चांगली राहिली आहे.  2018 वर्ल्डकपमध्येही संघ उपविजेता ठरला होता. मात्र यंदाच्या विश्वचषकात अर्जेंटिनाचं चक्रव्यूह भेदण्यात क्रोएशिया अपशय आलं. अर्जेंटिना डायमंड फॉर्मेशनसह मैदानात उतरली होती. ही रणनिती इतकी जबरदस्त होती की, क्रोएशियन खेळाडूंचं काहीच चाललं नाही. सामन्याला सुरुवात झाली तेव्हा कोणता संघ गोल करून आघाडी मिळवेल याकडे सर्वांचं लक्ष लागून होतं. अर्जेंटिना या सामन्यात 4-4-2 या रणनितीसह उतरली होती. चार डिफेंडर, चार मिडफिल्डर आणि दोन स्ट्राईकरचा यात समावेश होता. या रणनितीला डायमंड फॉर्मेशन म्हणून संबोधलं जातं. तर क्रोएशिया 4-3-3 या रणनितीसह मैदानात उतरली होती. यात चार डिफेंडर, तीन मिडफिल्डर आणि तीन स्ट्राईकरचा समावेश होता. 

अर्जेंटिनाच्या डायमंड फॉर्मेशनमध्ये लियोनल मेस्सी आणि जूलियन एल्वारेज स्ट्राईकरच्या भूमिकेत होते. पहिल्या हाफपासून दोन्ही खेळाडू आक्रमक होते. 34 व्या मिनिटाला एल्वोरेजला पेनल्टी मिळाली. मेसीनं या संधीचं सोनं केलं आणि फ्री किकच्या जोरावर गोल केला. त्यानंतर पाच मिनिटांनी म्हणजेच 39 व्या मिनिटाला जुलियन एल्वारेजनं गोल करत 2-0 ने आघाडी मिळवली. पहिल्या डावात अर्जेंटिनावर दबाव निर्माण झाला. दुसऱ्या डावातही हा दबाव कमी झाला नाही. 69 व्या मिनिटाला एल्वारेजनं तिसरा गोल केला आणि विजयाकडे वाटचाल करून दिली. शेवटच्या मिनिटापर्यंत क्रोएशियाला बरोबरी साधता आली नाही.

बातमी वाचा- FIFA WC 2022: फ्री किक मारताना एक खेळाडू जमिनीवर का झोपतो? Video पाहा आणि समजून घ्या

दोनच्या विजेतेपदावर नाव कोरलेला अर्जेंटिना संघ सहाव्यांदा फीफा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. अर्जेंटिनानं 92 वर्षे जुना आपला रेकॉर्ड कायम ठेवला आहे. अर्जेंटिना उपांत्य फेरीत कधीच पराभूत झालेली नाही. अंतिम फेरीत संघाने दोनदा विजय मिळवला आहे. 1978 आणि 1986 ला संघानं विश्वचषकावर नाव कोरलं आहे.