Jenni Hermoso kiss Controversy : फिफा वुमेन्स वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये (Fifa Women World Cup) स्पेनने इंग्लंडचा 1-0 ने पराभव केला. अंतिम सामना जिंकल्यानंतर स्पेनच्या खेळाडूंनी मोठा जल्लोष केला. मात्र, सेलिब्रेशन सुरू असताना लाजीरवाणा प्रकार घडल्याचं समोर आलंय. स्पेनच्या महिला खेळाडूसोबत धक्कादायक घटना घडली. सेलिब्रेशन करताना स्पेनची स्ट्रायकर जेनी हर्मोसोला स्पॅनिश एफए अध्यक्ष लुईस रुबियल्स (Luis Rubiales) यांनी महिला खेळाडूला एक नाही तर 3 वेळा ओठांवर किस केलं. त्यानंतर लुईस रुबियल्स खेळाडूला किस करतानाचा व्हिडीओ (Viral Video) व्हायरल झाला.
सेलिब्रेशन करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संताप व्यक्त होत आहे. स्पेनच्या पंतप्रधानांनीही नाराजी जाहीर केली. त्याचबरोबर पंतप्रधानांनी माफी मागण्यास सांगितलं. त्यानंतर देसभरात आनंदोत्सव साजरा होत असताना संतापाची लाट देखील पहायला मिळाली. त्यानंतर आता फिफाने मोठी कारवाई केल्याचं पहायला मिळतंय. फिफाने कारवाई केली असून, लुईस रुबियालेसला आगमी फुटबॉल सामन्यातून निलंबित करण्यात आले आहे.
स्पॅनिश माध्यमांमध्ये लुईस रुबियालेस यांच्या राजीनाम्याच्या अफवा पसरल्यानंतर 24 ऑगस्ट रोजी फिफाने वादाचा प्राथमिक तपास सुरू केला. रुबियालेसने राजीनामा देण्यास नकार दिल्यानंतर फिफाचा निर्णय समोर आला आहे. 'फिफा शिस्तपालन संहिता (FDC) च्या कलम 51 द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, फिफा शिस्तपालन समितीचे अध्यक्ष, जॉर्ज इव्हान पॅलासिओ यांनी लुईस रुबियालेसला फुटबॉलशी संबंधित सर्व प्रक्रियेतून तात्पुरतं निलंबित केल्याची माहिती फिफाकडून देण्यात आली आहे.
For those looking for the Spanish Federation (RFEF) president kissing forward Jenni Hermoso on the lips during the medal presentation, here's the video pic.twitter.com/9lcNhbVGED
— Aali (@Aali_fc) August 21, 2023
दरम्यान, लुईस रुबियालेस यांचं निलंबन राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर लागू असेल. घडलेल्या प्रकारानंतर मोठ्या प्रमाणात चर्चा झाल्याचं दिसून आलं. खुद्द पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांनी देखील या घटनेवर टीका केली आणि स्पेनचे रुबियाल्स यांना पद सोडण्यास सांगितलं होतं. त्यानंतर लुईस रुबियालेस यांनी राजीनामा देण्यास नकार दिली होता. त्यानंतर आता फिफाची कारवाई झाल्याचं पहायला मिळतंय.