ड्रायव्हरची गरजच नाही, पाहा सचिन तेंडुलकरची 'स्मार्ट' कार

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर त्याच्या नव्या पोस्टमुळे चर्चेत आला आहे. 

Updated: Aug 2, 2019, 10:31 PM IST
ड्रायव्हरची गरजच नाही, पाहा सचिन तेंडुलकरची  'स्मार्ट' कार    title=

मुंबई : क्रिकेटच्या मैदान गाजवणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर त्याच्या नव्या पोस्टमुळे चर्चेत आला आहे. सचिनेने नवी कोरी स्मार्ट कार घेतली आहे. त्याने समाज माध्यमावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत सचिनची कार पार्क करत आहे. मात्र, तो ड्रायव्हर सीटवर न बसता तो शेजारच्या सीटवर बसला आहे आणि त्याची कार पार्क होत आहे. असा तो व्हिडिओ आहे. सचिनची कार पार्क करतोय तो म्हणजे मिस्टर इंडिया.

Felt like 'Mr India' had taken control: Sachin Tendulkar after riding his first driver-less car

विश्वास बसत नाही ना. पण हे खरे आहे. या व्हिडिओत सचिन आपल्या नव्या कोऱ्या कारच्या पॅसेंजर सीटवर बसला आहे आणि त्याची आलिशान कार पार्क होत आहे. पण ही कार ऑटोमॅटीक आहे. म्हणजे कार पार्क करण्यासाठी चालकाची गरज नाही. अशा या ऑटोमॅटीक कारमध्ये सचिनने त्याच्या घराच्या पार्किंगमध्ये फेरफटका मारला. यावेळी त्यानं हा व्हिडिओ शूट केला आहे.

पाहा हा व्हिडिओ :

सचिन तेंडुलकर याने कार चालवण्याचे श्रेय मिस्टर इंडिया दिले असले तरी ही कार म्हणजे बीएमडब्लूची फेसलिफ्ट सेवन सीरिज असावी असे काहींचे म्हणणे आहे. ही कार पार्किंगमध्ये स्वतः स्वतःची जागा निश्चित करते. त्यामुळे पार्किंगमध्ये दुसऱ्या गाड्यांची होणारी टकर टळते, अशी या कारची खासियत आहे.