T20 World Cup 2022 मधून पाकिस्तान बाहेर? जाणून घ्या यामागचं कारण

South Africa vs Pakistan : टी-20 विश्वचषक स्पर्धेत रविवारी होणाऱ्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढतीकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे. दरम्यान, या लढतीपूर्वी पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. 

Updated: Nov 2, 2022, 03:29 PM IST
T20 World Cup 2022 मधून पाकिस्तान बाहेर? जाणून घ्या यामागचं कारण  title=

T20 WC Pakistan : टी 20  विश्वचषक 2022 स्पर्धेत दक्षिण गुरुवारी (३ नोव्हेंबर) सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या महत्त्वपूर्ण सामन्यापूर्वी पाकिस्तानला (South Africa vs Pakistan) मोठा धक्का बसला आहे. डावखुरा फलंदाज फखर जमान (Fakhr Zaman) या सामन्यातून बाहेर पडला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे डॉक्टर नजीब सूमरो (Dr. Najeeb Soomro) यांनी सिडनी येथे प्रसारमाध्यमांना सांगितले. परिणामी हा स्टार खेळाडू बाहेर पडल्यामुळे पाकिस्तान संघाला मोठा धक्का बसला आहे. 

याबाबत पाकिस्तान संघाचे डॉक्टर नजीब (Fakhr Zaman)  म्हणाले की, नेदरलँड्सविरुद्धच्या (The Netherlands) सामन्यादरम्यान फखर जमानच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात तो निवडीसाठी उपलब्ध होणार नाही. तो एक धाडसी खेळाडू आहे आणि त्याने संघात पुनरागमन करण्यासाठी खूप मेहनत घेतली. पुनर्वसनानंतर तो संघात परतला. साहजिकच गुडघ्याची कोणतीही दुखापत पूर्णपणे बरी होण्यास वेळ लागतो. गेल्या सामन्यात त्याने कशी कामगिरी केली ते तुम्ही पाहिले. दुर्दैवाने त्याची दुखापत आणखीनच वाढली आहे. आम्ही त्यांचे स्कॅनिंग केले आहे, ज्यामध्ये नवीन जखम नाहीत.

वाचा : Team India चे 'हे' पाच खेळाडू संघाला सेमीफायनलमध्ये पोहोचवणार! 

फखरने टी-20 विश्वचषकात (t20 world cup 2022) एका सामन्यात फलंदाजी केली आहे. पर्थमध्ये नेदरलँड्सविरुद्ध त्याने 20 धावा केल्या होत्या. तो पूर्णपणे तंदुरुस्त नसल्यामुळे त्याला संघात समाविष्ट केल्याने माजी क्रिकेटपटूंनी पाकिस्तानी संघावर टीका केली होती. पाकिस्तानच्या संघाने सुपर-12 मध्ये तीनपैकी एक सामना जिंकला आहे. पाकिस्तानचा झिम्बाब्वे आणि भारताने पराभव केला आहे. त्यानंतर संघाने पुनरागमन करत नेदरलँड्सचा पराभव केला. दक्षिण आफ्रिकेशिवाय त्यांना उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी बांगलादेशलाही पराभूत करावे लागेल. याशिवाय इतर संघांच्या निकालावरही पाकिस्तानच्या नजरा असतील.