Sam Curran: सॅमने मागितली फाफची माफी; 'त्या' कृत्यावरून विराटही सॅमशी भिडला!

पंजाबच्या कर्णधारपदाची धुरा पुन्हा एकदा सॅम करनच्या (Sam Curran) खांद्यावर देण्यात आली होती. तर या सामन्यामध्ये सॅमसोबत एक घटना अशी ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. 

Updated: Apr 20, 2023, 08:59 PM IST
Sam Curran: सॅमने मागितली फाफची माफी; 'त्या' कृत्यावरून विराटही सॅमशी भिडला! title=

Sam Curran: पंजाब किंग्ज (Punjab Kings) विरूद्ध रॉयल चॅलेंजर बंगळूरू (Royal Challengers Bangalore) यांच्यामध्ये झालेल्या सामन्यात अखेर आरसीबीने बाजी मारली. आरसीबीने 24 रन्सने पंजावर विजय मिळवला. दरम्यान या सामन्यात देखील पंजाबच्या कर्णधारपदाची धुरा पुन्हा एकदा सॅम करनच्या (Sam Curran) खांद्यावर देण्यात आली होती. तर या सामन्यामध्ये सॅमसोबत एक घटना अशी ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. 

या सामन्यामध्ये सॅमने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी निर्णय घेतला. मात्र बंगळरूच्या फलंदाजांनी पंजाबच्या गोलंदाजांना चांगलंच चोपलं. यावेळी 16 वी ओव्हर सॅम करन (Sam Curran) करत असताना एक घटना घडली. यावेळी सॅमने फाफ ड्यू प्लेसिससोबत असं काही केलं, ज्यामुळे अखेरीस सॅमला त्याची माफी मागावी लागली.

का मागितली सॅमने फाफची माफी?

प्रथम गोलंदाजीचा निर्णय पंजाबच्या टीमला चांगलाच महागात पडला. गोलंदाजांची होणारी धुलाई पाहून 16 व्या ओव्हरमध्ये कर्णधार सॅम करन स्वतः गोलंदाजीसाठी आला. मात्र या ओव्हरचा पहिलाच बॉल सॅमने असा टाकला की, तो फाफच्या डोक्यावरून गेला. 

यावेळी फाफ अगदी थोडक्यात बचवला, अन्यथा त्याला हा बॉल लागून तो जखमी झाला असता. या बॉलला मैदानावर उपस्थित असलेल्या अंपारने त्याला नो बॉल करार दिला. यानंतर तातडीने सॅमने फाफची माफी मागितली. यावेळी नॉन स्ट्रायकर एंडला असलेला आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीनेही मस्करीत सॅमला मारण्याची एक्शन केली. दरम्यान ही संपूर्ण घटना कॅमेरात कैद झाली. 

रॉयल चॅलेंजर बंगळूरूचा विजय

टॉस हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी बंगळूरूची टीम मैदानात उतरली. यावेळी फाफ डू प्लेसिस आणि विराट कोहली यांनी पंजाबच्या गोलंदाजांना चांगलंच चोपलं. या दोन्ही खेळाडूंनी तुफान फलंदाजी करत पहिल्या विकेटसाठी 137 रन्सची पार्टनरशिप केली. 

दरम्यान हे दोघं आऊट झाल्यानंतर इतर कोणात्याही खेळाडूने चांगला खेळ केला नाही. दोघं बाद झाल्यानंतर इतरांना केवळ 38 अधिक रन्स केले. यानंतर 20 ओव्हर्समध्ये रॉयल चॅलेंदर बंगळूरूने 175 रन्सचं लक्ष्य पंजाबसमोर ठेवलं होतं

आरसीबीने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाबच्या फलंदाजांची चांगलीच दमछाक झाली. एकवेळ असी होती की, पंजाब दिलेलं लक्ष पूर्ण करेल असं वाटत होतं. मात्र संपूर्ण पंजाबची टीम अवघ्या 150 रन्सवर ऑलआऊट झाली.