मुंबई: चेन्नई सुपर किंग्स आणि दक्षिण अफ्रिकेच्या संघाला मोठा धक्का देणारी बातमी आहे. CSKचा स्टार खेळाडू म्हणून आयपीएलमध्ये गाजलेल्या खेळाडूनं अचानक निवृत्ती जाहीर केली आहे. दक्षिण अफ्रिकेसाठी आतापर्यंत 69 कसोटी सामने खेळलेल्या फाफ डु प्लेसिसने कसोटी सामन्यातून तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली आहे.
फाफ डु प्लेसिसच्या नावावर कसोटी सामन्यात 4163 धावांची नोंद करण्यात आली आहे. अचानक निवृत्ती जाहीर केल्यानं दक्षिण अफ्रिकेला मोठा झटका मिळाला आहे. गेल्या काही सामन्यांमध्ये फाफ डु प्लेसिसची कामगिरी देखील उत्तम नव्हती. त्यामुळे अचानक ही निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला असावा अशी चर्चा होत आहे.
नुकत्याच झालेल्या श्रीलंकेविरूद्ध दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यादरम्यान डु प्लेसिसने शानदार शतक ठोकले. त्याच्या या शतकी खेळीमुळे चहूबाजूने होणारी टीक शांत झाली. दक्षिण आफ्रिकेचा महान फलंदाज फाफ डु प्लेसिसने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. नुकतीच फाफ डु प्लेसिसने बुधवारी पाकिस्तानविरुद्धच्या दौर्यानंतर ही घोषणा केली. दक्षिण आफ्रिकेने 2 सामन्यांच्या मालिकेत पाकिस्तानचा 2-0 असा पराभव केला होता.
Faf du Plessis has announced his retirement from Test cricket.
He played 69 Tests for South Africa scoring 4163 runs at 40.02, including 10 centuries. pic.twitter.com/QfhRjsWqxr
— ICC (@ICC) February 17, 2021
फाफ डु प्लेसिस दक्षिण आफ्रिकेकडून आतापर्यंत 69 कसोटी सामने खेळले आहेत. यावेळी त्याने 10 शतके आणि 21 अर्धशतकांच्या मदतीने 4163 धावा केल्या आहेत. फाफ डु प्लेसिसचा कसोटीमध्ये सर्वोत्तम स्कोअर 199 धावांचा राहिला आहे. तर 143 एकदिवसीय सामन्यांमध्ये 5507 धावा केल्या आहेत.
एकदिवसीय सामन्यात त्याने 12 शतकं आणि 35 अर्धशतकं झळकावली आहेत. डु प्लेसिस यांनी 50 टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 1528 धावा केल्या आहेत. यात 1 शतक आणि 10 अर्धशतकांचा समावेश आहे.