IPL 2024 : गौतम गंभीरचा मास्टरस्ट्रोक, 'या' स्टार खेळाडूची अचानक KKR मध्ये एन्ट्री

Phil Salt Replace Jason Roy : गौतम गंभीरने फिल सॉल्टला ताफ्यात समावेश करुन मोठी खेळी केल्याचं बोललं जातंय. त्याची तीन कारण कोणती आहेत पाहुया...

सौरभ तळेकर | Updated: Mar 11, 2024, 04:59 PM IST
IPL 2024 : गौतम गंभीरचा मास्टरस्ट्रोक, 'या' स्टार खेळाडूची अचानक KKR मध्ये एन्ट्री title=
KKR signing Phil Salt for IPL 2024

Phil Salt in KKR : आयपीएलच्या 17 व्या हंगामाला (IPL 2024) आता बोटावर मोजण्याइतके दिवस शिल्लक राहिले आहेत. आयपीएलच्या पहिल्या टप्प्यातील टाईमटेबल जाहीर झालंय. त्यानुसार, आयपीएलचा पहिला सामना चेन्नई आणि बंगळुरू यांच्यात खेळवला जाईल. अशातच आयपीएलपूर्वी कोलकाता नाईट रायडर्सला (KKR) मोठा धक्का बसला आहे. केकेआरचा स्टार खेळाडू जेसन रॉय (Jason Roy) यंदाच्या हंगामातून बाहेर पडला आहे. जेसन रॉयने वैयक्तिक कारणांमुळे आयपीएल 2024 मध्ये न खेळण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे आता समोर दिसत असलेल्या संधीचं सोनं करत कोच गौतम गंभीरने मास्टरस्ट्रोक खेळलाय. केकेआरमध्ये एका नव्या खेळाडूची (Phil Salt in KKR) एन्ट्री झालीये.

कोलकाता नाईट रायडर्सने जेसन रॉयच्या जागी फिल सॉल्टचा संघात समावेश केलाय. फिल सॉल्ट गेल्या वर्षी दिल्ली कॅपिटल्समध्ये होता. मात्र, दिल्लीने यंदा त्याला रिलीज केलं होतं. त्यानंतर आता त्याला केकेआरमध्ये एन्ट्री मिळाली आहे. गौतम गंभीरने फिल सॉल्टला ताफ्यात समावेश करुन मोठी खेळी केल्याचं बोललं जातंय. त्याची तीन कारण कोणती आहेत पाहुया...

आयपीएल लिलावानंतर केकेआरकडे रहमानुल्ला गुरबाज आणि श्रीकर भरत हे विकेटकीपिंग पर्याय होते. पण त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन्ही खेळाडू फिट होत नाहीत. त्यामुळे फिल सॉल्टला संधी मिळेल, अशी दाट शक्यता आहे.

केकेआरच्या ताफ्यात सेहवाग सारख्या सलामीवीराची कमतरता दिसत होती. गेल्या दोन वर्षात केकेआरने 12 वेळा ओपनिंग पेअर्स बदलल्या होत्या. त्यामुळे आता ओपनिंगमध्ये फिल आल्याने व्यंकटेश अय्यरला फिनशिंगची जबाबदारी मिळू शकते.

केकेआरकडे वरुण चक्रवर्ती, सुनील नरेन आणि सुयश शर्मा यांच्यासारखे फिरकीपटू असले तरी देखील फिल सॉल्टच्या रुपात केकेआरला आणखी एक स्पिनर मिळाला आहे. त्यामुळे आता फिल सॉल्टची भूमिका नेमकी कशी असेल? असा सवाल विचारला जात आहे.

केकेआरचा संघ (KKR Team For IPL 2024): नितीश राणा, रिंकू सिंग, रहमानउल्ला गुरबाज, श्रेयस अय्यर (C), फिल सॉल्ट, सुनील नरेन, सुयश शर्मा, अनुकुल रॉय, आंद्रे रसेल, व्यंकटेश अय्यर, हर्षित राणा, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती, केएस भरत, चेतन साकरिया, मिचेल स्टार्क, अंगक्रिश रघुवंशी, रमणदीप सिंग, शेरफेन रदरफोर्ड, मनीष पांडे, मुजीब उर रहमान, गस ऍटकिन्सन, साकिब हुसेन.

IPL 2024 चं वेळापत्रक

२२ मार्च - चेन्नई सुपर किंग्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, रात्री ८ वा.पासून, चेन्नई
२३ मार्च - पंजाब किंग्स वि. दिल्ली कॅपिटल्स, दुपारी ३.३० वा. पासून, मोहाली
२३ मार्च - कोलकाता नाइट रायडर्स वि. सनरायझर्स हैदराबाद, रात्री ८ वा. पासून, कोलकाता
२४ मार्च - राजस्थान रॉयल्स वि. लखनऊ सुपर जायंट्स, दुपारी ३.३० वा.पासून, जयपूर
२४ मार्च - गुजरात टायटन्स वि. मुंबई इंडियन्स, रात्री ८ वा. पासून, अहमदाबाद
२५ मार्च - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. पंजाब किंग्स, रात्री ८ वा. पासून, बंगळुरू
२६ मार्च - चेन्नई सुपर किंग्स वि. गुजरात टायटन्स, रात्री ८ वा.पासून, चेन्नई
२७ मार्च - सनरायझर्स हैदराबाद वि. मुंबई इंडियन्स, रात्री ८ वा. पासून, हैदराबाद
२८ मार्च - राजस्थान रॉयल्स वि. दिल्ली कॅपिटल्स, रात्री ८ वा. पासून, जयपूर
२९ मार्च - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. कोलकाता नाइट रायडर्स, रात्री ८ वा. पासून, बंगळुरू
३० मार्च - लखनऊ सुपर जायंट्स वि. पंजाब किंग्स, रात्री ८ वा. पासून, लखनौ
३१ मार्च - गुजरात टायटन्स वि. सनरायझर्स हैदराबाद, दुपारी ३.३० वा. पासून, अहमदाबाद
३१ मार्च - दिल्ली कॅपिटल्स वि. चेन्नई सुपर किंग्स, रात्री ८ वा. पासून, विशाखापट्टणम
१ एप्रिल - मुंबई इंडियन्स वि. राजस्थान रॉयल्स, रात्री ८ वा. पासून, मुंबई
२ एप्रिल - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. लखनऊ सुपर जायंट्स, रात्री ८ वा. पासून, बंगळुरू
३ एप्रिल - दिल्ली कॅपिटल्स वि. कोलकाता नाइट रायडर्स, रात्री ८ वा. पासून, विशाखापट्टणम
४ एप्रिल - गुजरात टायटन्स वि. पंजाब किंग्स, रात्री ८ वा. पासून, अहमदाबाद
५ एप्रिल - राजस्थान रॉयल्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू,रात्री ८ वा. पासून, जयपूर
७ एप्रिल - मुंबई इंडियन्स वि. दिल्ली कॅपिटल्स, दुपारी ३.३० वा.पासून, मुंबई
७ एप्रिल - लखनऊ सुपर जायंट्स वि. गुजरात टायटन्स, रात्री ८ वा. पासून, लखनऊ