Shubman Gill: 16 तास उलटून गेले तरीही...; पराभवाच्या आठवणी शुभनच्या डोळ्यासमोरून जाईना, केली खास पोस्ट

Shubman Gill Post: या पराभवानंतर टीम इंडियाचा सलामीवीर शुभमन गिलने ( Shubman Gill ) इन्स्टाग्रामवर पोस्ट केलीये. या पोस्टमध्ये त्यांनी पराभवानंतरच्या वेदना व्यक्त केल्या आहेत. 

सुरभि जगदीश | Updated: Nov 21, 2023, 09:57 AM IST
Shubman Gill: 16 तास उलटून गेले तरीही...; पराभवाच्या आठवणी शुभनच्या डोळ्यासमोरून जाईना, केली खास पोस्ट title=

Shubman Gill Post: रविवारी रात्री असंख्य क्रिकेट चाहत्यांचा स्वप्नांचा चुराडा झाला. ऑस्ट्रेलियाच्या टीमने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये भारताचा 6 विकेट्सने पराभव केला. या विजयासह कांगारूंनी सहाव्यांदा वर्ल्डकपच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे. फायलनमध्ये झालेल्या पराभवानंतर टीम इंडियाच्या ( Team India ) खेळाडूंच्या चेहऱ्यावर देखील निराशा दिसून आली. सामना संपून एक दिवस झाला मात्र तरीही पराभावाच्या आठवणी टीम इंडियाचा स्टार खेळाडू शुभमन गिलच्या ( Shubman Gill ) डोळ्यासमोरून जात नसल्याचं त्याने म्हटलंय. 

वर्ल्डकपच्या फायनल सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून टीम इंडियाचा ( Team India ) 6 विकेट्सने पराभव झाला. या पराभवाने कोट्यवधी भारतीय क्रिकेट चाहत्यांची मनं तुटली. या पराभवानंतर टीम इंडियाचा सलामीवीर शुभमन गिलने ( Shubman Gill ) इन्स्टाग्रामवर पोस्ट केलीये. या पोस्टमध्ये त्यांनी पराभवानंतरच्या वेदना व्यक्त केल्या आहेत. 

कधी-कधी 100 टक्केही पुरेसे नसतात- शुभमन

शुभमन गिलने ( Shubman Gill ) इन्स्टाग्रामवर संपूर्ण टीम इंडियाचा ( Team India ) फोटो पोस्ट केला आहे. यावेली पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय की, जवळपास 16 तास उलटले आहेत, हे सर्व काल रात्री घडलं. कधी कधी तुम्ही तुमचे 100 टक्के देता, पण ते पुरेसे नसते. आम्ही आमच्या अंतिम ध्येयापासून कमी पडलो. पण या अद्भुत प्रवासात आमच्या टीमने उत्तम समर्पण दाखवलं.

आम्ही हरलो खरे...

शुभमन गिलने ( Shubman Gill ) पुढे लिहिलंय की, आमच्या चाहत्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केला. आम्ही जिंकलो किंवा हरलो, तुमचा पाठिंबा आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. पण या पराभवानंतर सर्व काही गमावलं नाही... जय हिंद. 

चाहत्यांना शुभमन गिलची ( Shubman Gill ) ही पोस्ट प्रचंड आवडली असून चाहते विविध कमेंट्स करतायत. शुभमन गिलची पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. या वर्ल्डकपमध्ये शुभमन गिलने उत्तम फलंदाजी केली. मात्र अंतिम सामन्यात त्याला मोठा आणि साजेसा खेळ करता आला नाही.