मुंबई : खेळाडू म्हटलं तर प्रसिद्धी पैसा आलाचं. या खेळाडूंना एकदा का देशासाठी खेळल्यावर आर्थिक चणचण भासत नाही. देशासाठी खेळल्यावर या खेळाडूंना बक्कळ पैसे मिळतात, यासाठी ते तितकी मेहनत ही करतात हे टाळून चालणार नाही. मात्र इतकं होऊन सुद्धा एका स्टार खेळाडूच्या सुनेला पॉर्न इंडस्ट्रीत प्रवेश करावा लागल्याची घटना घडलीय. एका खेळाडूच्या सुनेने असे पाऊल उचलल्याने आश्चर्य व्यक्त होतेय.
इंग्लंडचा फुटबॉल क्लब साउथहॅम्प्टनचा दिग्गज फुटबॉलपटू मॅट ली टिसियरची सून असलेल्या अॅलेक्सला पॉर्न स्टार बनावे लागले. मॅट लीचा मुलगा मिच याची अॅलेक्स बायको आहे.घरावर कोसळलेल्या आर्थिक संकटामुळे तिला पॉर्न इंडस्ट्रीत प्रवेश करावा लागला.
खरं तर कोरोनामुळे सर्वांनाच हादरुन सोडले होते. कोरोना काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या होत्या, त्यामुळे असंख्य कुटुंब रस्त्यावर आली होती. त्यामुळे स्वत:च्या घराला आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी तिने पॉर्नस्टार बनण्यासारखा कठोर निर्णय घेतला.
विशेष म्हणजे कोरोनाआधी मिच नोकरी करायचा तर अॅलेक्स घरी राहून मुलांची काळजी घ्यायची. मात्र कोरोनानंतर परिस्थिती बदलली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेण्यासाठी अॅलेक्सला पॉर्न इंडस्ट्रीत प्रवेश केला.
अॅलेक्स या इंडस्ट्रीतून सध्या खुप कमाई करतेय. ती महिन्याचे सुमारे चार लाख रुपये घेते. दरम्यान याबाबत तिने सोशल मिडीयावर माहिती दिली नव्हती. तसेच त्याने सुरुवातीला तिला फोटो शेअर करण्यास देखील विरोध केला होता.
अॅलेक्सचा नवरा मिचही तिला खूप सपोर्ट करतो. मिचने स्वतःला इंस्टाग्राम लिजेंडचा पती देखील म्हटले आहे. अॅलेक्सने सुरुवातीला त्याच्या 2 बहिणी आणि दोन मित्रांना सांगितले. त्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर याची घोषणा केली.