England Coach Michael Hussey on Suryakumar Yadav: सध्या सुरू असलेल्या टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये उद्यापासून सेमीफायनल सामन्यांना सुरूवात होत आहे. पहिला सेमीफायनल (1st Semi-Final) सामन्यात न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान (New Zealand vs Pakistan) सामना रंगणार आहे. तर दुसरा सेमीफायनल (2nd Semi-Final) सामना भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात खेळला जाईल, अशातच आता ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज क्रिकेटर आणि इंग्लंडचा वर्ल्ड कप कोचने मोठं वक्तव्य केलंय.
इंग्लंडचा वर्ल्ड कप कोच मायकल हसीने (England Coach Michael Hussey) माध्यमांशी बोलताना असं काही वक्तव्य केलंय की अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. मायकल हसीने सेमीफायनल सामन्यात सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) जास्त धावा करू नयेत, अशी इच्छा व्यक्त केली आहे. त्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय
माध्यमांशी बोलताना हसी म्हणाला, 'सूर्यकुमार यादवने सातत्याने चांगली कामगिरी करतोय आणि तो आयपीएलमध्ये जबरदस्त खेळत होता. आता तो आंतरराष्ट्रीय स्तरावरही अशीच कामगिरी करतोय. त्याला फलंदाजी करताना पाहून खूप आनंद होतो. मात्र, आशा आहे की तो इंग्लंडविरुद्ध (INDvsENG) मोठी खेळी खेळणार नाही, असं मायकल हसी म्हणाला आहे. (I hope Suryakumar Yadav doesn't get a big score against England)
आणखी वाचा - IND vs ENG T20 सामन्याआधी मोठा बदल; 'या' धाकड खेळाडूची संघात एन्ट्री!
दरम्यान, मायकल हसीच्या (Michael Hussey) या वक्तव्यानंतर आता क्रिडाविश्वास एकच चर्चा होताना दिसत आहे. सुर्यकुमारने मागील 3 सामन्यात अर्धशतक ठोकलंय. सध्याच्या वर्ल्ड कपमध्ये त्यानं 225 धावा नावावर करत जास्त धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तिसरं स्थान मिळवलंय. त्यामुळे सामन्याआधीच इंग्लंडने सुर्याची धास्ती घेतली आहे.