England vs New Zealand 2nd Test : न्यूझीलंडने मंगळवारी इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात (ENG vs NZ) इंग्लंड क्रिकेट संघाचा 1 धावेने पराभव केला. वेलिंग्टन येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात इंग्लंड संघाला विजयासाठी 258 धावांचे लक्ष्य होतं, त्याला प्रत्युत्तर देताना इंग्लंडचा संघ केवळ 256 धावाच करू शकला. विजयासाठी 2 धावांची गरज असताना इंग्लंडला अखेरची विकेट पडली आणि हातात आलेला सामना इंग्लंडने गमावला आहे. (ENG vs NZ 2nd Test New Zealand thrilling win against England by just 1 run latest marathi news)
न्यूझीलंडच्या या विजयासह मालिका 1-1 अशी बरोबरीत सुटली आहे. इंग्लंडला विजयासाठी 2 धावा आणि न्यूझीलंडला 1 विकेटची गरज असताना सामना शेवटच्या क्षणी दोन्ही बाजूने जाऊ शकला असता. त्यानंतर निकाल न्यूझीलंडच्या बाजूने गेला. अॅडरसन मैदानात आला तेव्हा न्यूझीलंडला 5 धावांची गरज होती. मात्र, वॅगनरने अॅडरसनची विकेट काढली आणि मोक्याच्या क्षणी पारडं फिरलं.
The lady in the back at 0:08#ENGvsNZpic.twitter.com/DYk6kfbmdi
— Leg_Cutter (@TweetECricket) February 28, 2023
इंग्लंडने पहिल्या डावात 435 धावा केल्या होत्या. त्यात हॅरी ब्रुकने (Harry Brook) 186 धावांची वादळी खेळी केली. तर जो रूटने देखील 153 धावा केल्या होत्या. त्याला प्रत्युत्तर देताना न्यूझीलंडला फक्त 209 रन्स करता आल्या. कॅप्टन साऊदीने सर्वाधिक 73 धावा केल्या होत्या.पहिल्या डावानंतर फॉलोऑन मिळाला. त्यावेळी न्यूझीलंडने सावध खेळी करत 483 धावांचा डोंगर उभारला.
आणखी वाचा - Indian Cricket: टीम इंडियाला आणखी एक धक्का; धडाकेबाज खेळाडू नाईलाजानं संघाबाहेर
न्यूझीलंडने इंग्लंडला विजयासाठी 258 धावांचे लक्ष्य दिलं. त्यावेळी कमी धावाचं आव्हान असल्याने न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी भेदक मारा केला. कॅप्टन साऊथीने (Tim Southee) खांद्यावर जबाबदारी घेत पहिल्या दोन विकेट काढल्या. तर हेन्रीने दुसऱ्या बाजूने आक्रमण सुरू ठेवलं. Neil Wagner ने मध्या फळीत गोलंदाजी करत 4 विकेट घेतल्या. अखेरच्या क्षणी अॅडरसनची विकेट घेत न्यूझीलंडने रोमांचक सामना खिश्यात घातला आहे.
केन विल्यमसनने (Kane Williamson) न्यूझीलंडकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. त्याने न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू रॉस टेलरला (Ross Taylor) मागे टाकलं आहे. रॉसने त्यानंतर ट्विट करत केनचं कौतूक देखील केलं आहे. त्यामुळे सध्या केन सोडून रॉसची चर्चा होताना दिसतेय.