ENG vs IND | शुभमन गिलसोबत टीम इंडियाकडून ओपनिंगला कोण उतरणार?

रोहित शर्माला कोरोना! 4 कसोटीत 227 रन बनवणारा स्टार खेळाडू करणार टीम इंडियाकडून ओपनिंग?

Updated: Jun 30, 2022, 10:52 AM IST
ENG vs IND | शुभमन गिलसोबत टीम इंडियाकडून ओपनिंगला कोण उतरणार? title=

मुंबई : रोहित शर्माला कोरोना झाल्यानंतर तो उपचार घेत आहे. अजून तो पूर्णपणे बरा झाला नाही. त्याऐवजी आता टीम इंडियाचं नेतृत्व जसप्रीत बुमराहकडे देण्यात आलं आहे. कसोटी फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचा बुमराह 36 वा कर्णधार ठरला आहे. 

आता कर्णधारपद कोणाकडे याची घोषणा झाली मात्र रोहितच्या अनुपस्थितीमध्ये टीम इंडियाकडून ओपनिंगला कोण उतरणार या प्रश्नाचं उत्तर मिळणं अजूनही बाकी आहे. इंग्लंड विरुद्ध 1 जुलैपासून पाचवा कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात ओपनिंगसाठी धडाकेबाज फलंदाजाचं नाव समोर आलं आहे. 

या फलंदाजाने 4 कसोटी सामन्यात 227 धावा केल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी तो खेळाडू फ्लॉप शो करत होता. मात्र काउंटीमध्ये त्याने मैदान गाजवलं. जसप्रीत बुमराह या खेळाडूला ओपनिंगची संधी देऊ शकतो. 

चेतेश्वर पुजारा आणि शुभमन गिल जोडी ओपनिंगसाठी उतरण्याची शक्यता आहे. याशिवाय हनुमा विहारी आणि के एस भरत ही जोडी देखील दावेदार ठरू शकते. 2018 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध हनुमाने चांगली फलंदाजी केली होती. 

बॉलिंगसाठी शार्दूल ठाकूरला संधी मिळू शकते. जडेजा आणि अश्विन जोडी हिट असल्याने बॉलिंग लाइन तगडी आहे. मात्र पुजाराने ओपनिंग केली तर हनुमा आणि विराट कोहलीपैकी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी कोण उतरणार याबाबत उत्सुकता आहे. 

35 वर्षांनंतर टीम इंडियाच्या कर्णधारपदी बॉलरची निवड करण्यात आली आहे. याआधी वेगवान गोलंदाज कपिल देव यांनी टीमचं नेतृत्व केलं होतं. त्यानंतर बरोबर 35 वर्षांनी वेगवान बॉलर बुमराहकडे टीम इंडियाच्या कर्णधारपदाची कमान आली आहे.