Dutee Chand: भारतीय क्रीडा क्षेत्राला मोठा धक्का! स्टार धावपटू डोपिंगच्या विळख्यात, थेट बंदीची कारवाई

Dutee Chand: भारताची स्टार महिला धावपटू दुती चंद डोप चाचणीत पॉझिटिव्ह आढळली आहे. त्यानंतर तिच्यावर बंदी लावण्यात आली आहे.   

Updated: Jan 18, 2023, 04:46 PM IST
Dutee Chand: भारतीय क्रीडा क्षेत्राला मोठा धक्का! स्टार धावपटू डोपिंगच्या विळख्यात, थेट बंदीची कारवाई  title=

Dutee Chand tests positive: भारताची स्टार महिला अॅथलीट दुती चंद (Dutee Chand) डोपिंग चाचणीत पॉझिटिव्ह (doping test Positive) आढळली आहे. त्यानंतर तिच्यावर कारवाई करण्यात आली आहे. भारतीय ऑलिंपिक संघटनेने स्पर्धेतून तिच्यावर बंदी लावण्यात आली आहे. देशातील सर्वात वेगवान महिला धावपटू दुती चंद ही आशियाई क्रीडा स्पर्धेतील रौप्यपदक विजेती आहे. तसेच, ती वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्समध्ये 100 मीटर स्पर्धेत चॅम्पियन ठरली आहे. इनडोअर गेम्समध्ये सर्वात जलद 60 मीटर 7.28 सेकंदात पूर्ण करण्याचा राष्ट्रीय विक्रम तिच्या नावावर आहे. 2016 मध्ये दोहा येथे तिने हा विक्रम केला होता.