दुबई : इंडियन प्रीमियर लीगच्या आजच्या सामन्यात अशा दोन टीम स्पर्धा करतील, ज्या दोन्ही टीम्सना स्पर्धेत टीकून राहण्यासाठी प्रत्येक सामना जिंकणं आवश्यक आहे. सलग दोन सामने गमावल्यानंतर मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला प्लेऑफच्या शर्यतीत राहण्यासाठी रविवारचा सामना जिंकणं आवश्यक आहे.
रोहित शर्माची टीम मुंबई इंडियन्स गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे. विराट कोहलीची टीम रॉयल चॅलेंजर बंगळूरूने या दोघांनीही सलग दोन सामने गमावूनही तिसरं स्थान कायम राखलं आहे.
मुंबई आणि बंगळुरची आकडेवारी पाहिली तर रोहित शर्माच्या टीमचं पारडं जड असल्याचं दिसून येतंय. दोन्ही संघांमध्ये खेळल्या गेलेल्या एकूण 30 सामन्यांपैकी 19 सामने मुंबईने जिंकले आहेत, तर बंगळुरूने 11 सामने जिंकले आहेत.
दरम्यान प्ले ऑफमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी दोन्ही टीम्सना जिंकणं हे गरजेचं आहे. त्यामुळे सर्वोत्तम प्लेअयर मैदानावर उतरवून बाजी मारण्याचा दोन्ही टीम्सचा प्रयत्न असणार आहे. मुंबई इंडियन्सने या सामन्यासाठी खास रणनीती आखली असल्याचं समजतंय. हार्दिक पांड्या खेळणार की नाही याबद्दल देखील मोठे अपडेट्स दिले आहेत.
झहीर खान म्हणाला, "आम्ही सराव सत्र करू आणि त्यानंतरच निर्णय घेऊ. हार्दिकने सराव सुरू केला आहे आणि हे आम्ही या क्षणी हीच गोष्ट आपल्याबरोबर शेअर करू शकतो. आम्हाला आशा आहे की तो तंदुरुस्त असेल आणि RCB विरुद्धच्या सामन्यासाठी उपस्थित असेल.