...म्हणून कार्तिक मानतोय कोहलीचे आभार!

आज भारत आणि न्यूझीलंडचा टी20 मॅच आज  फिरोज शाह कोटलाच्या मैदानावर होणार आहे.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Nov 1, 2017, 01:07 PM IST
...म्हणून कार्तिक मानतोय कोहलीचे आभार! title=

नवी दिल्ली : आज भारत आणि न्यूझीलंडचा टी20 मॅच आज  फिरोज शाह कोटलाच्या मैदानावर होणार आहे. हा सामना भारतीय टीमसाठी खास आहे. कारण भारताचा वेगवान गोलंदाज आशीष नेहरा या मॅचनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे.

team india

टी20 च्या विजयासाठी भारतीय टीमने जोरदार तयारी केली आहे. यापूर्वी कर्णधार विराट कोहली याने आपल्या सहकाऱ्यांना आराम करण्याची संधी दिली होती. आपल्या सहकाऱ्यांना नाईट आऊटची संधी दिल्याने दिनेश कार्तिकने आपल्या कर्णधार मित्राचे आभार मानले आहेत. नाईट आऊटच्या मस्तीचे काही फोटो त्याने ट्विटरवर शेअर केले आहेत. त्याचबरोबर कार्तिकने नाईट आऊटमध्ये सहभागी झालेल्या आपल्या मित्रमंडळींचे देखील आभार मानले. खेळावर घेतलेल्या मेहनतीनंतर ही एन्जॉयमेंट खेळाडूंसाठी खास ठरली.

वनडे सीरीज प्रमाणे टी-20 सीरीज देखील चांगली असेल, अशी आशा भारतीय टीमला आहे.