VIDEO: इंटरव्यू देताना अचानक Dinesh Karthik घाबरला, आकाशाकडे पाहिलं आणि...

दिनेश कार्तिक प्रश्नांची उत्तरं देत असताना अचानक एक विचित्र प्रसंग घडलेला दिसला.

Updated: Jun 18, 2022, 02:01 PM IST
VIDEO: इंटरव्यू देताना अचानक Dinesh Karthik घाबरला, आकाशाकडे पाहिलं आणि... title=

मुंबई : दिनेश कार्तिक म्हणजेच ​​डीके बॅट सध्या तुफान चालतेय. आयपीएल 2022 चा बेस्ट फॉर्म कायम ठेवत, डीकेने शुक्रवारी राजकोटमधल्या चौथ्या T20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शानदार खेळी खेळली. दिनेश कार्तिकने T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिलं अर्धशतक झळकावलं आणि टीम इंडियाच्या विजयाचा पाया रचला.

दरम्यान सामन्याच्यामध्ये ब्रेकदरम्यान कार्तिकला काही प्रश्न विचारण्यात आले. यावेळी प्रश्नांची उत्तरं देत असताना अचानक एक विचित्र प्रसंग घडलेला दिसला. 

दिनेश कार्तिक उत्तरं देण्यासाठी उभा होता, तेव्हा अचानक त्याने वर पाहिलं. यावेळी त्याच्या चेहऱ्यावर भीती दिसत होती. क्षणभर थांबून तो वर पाहत होता. वर पाहताना कार्तिकच्या चेहऱ्यावरही आश्चर्याचे भाव होते. यानंतर त्याने मुलाखत पुन्हा सुरू केली आणि म्हणाला, 'माफ करा, मला वाटले की बॉल याच दिशेने येतोय.'

दिनेश कार्तिक पुढे म्हणाला, "आज आम्ही जे काही केलं त्यामुळे मी खूप आनंदी आहे. शेवटच्या 7 ओव्हरमध्ये आम्ही 80-85 धावा करू शकतो, असा मला विश्वास होता. जोखीम ही अशी गोष्ट आहे जी तुम्हाला टी-20 क्रिकेटमध्ये आत्मसात करायची आहे."

काल दक्षिण आफ्रिकेविरूद्ध झालेल्या सामन्यात कार्तिकने अवघ्या 26 चेंडूंच्या मदतीने अर्धशतक पूर्ण केलं. कार्तिकला अर्धशतकासाठी 1 धावेची गरज असताना त्याने खणखणीत 85 मीटर लांब सिक्स लगावला. कार्तिकने अर्धशतकी खेळीत 9 चौकार आणि 2 गगनचुंबी सिक्स ठोकले. मात्र अर्धशतकी खेळीनंतर कार्तिक आऊट झाला. कार्तिकने एकूण 55 धावांची खेळी केली.