दिनेश कार्तिकची भर मैदानात सहकाऱ्याला शिवीगाळ

आयपीएलच्या एलिमिनेटर मॅचमध्ये हैदराबादनं कोलकात्याचा १४ रननी पराभव केला.

Updated: May 27, 2018, 08:27 PM IST
दिनेश कार्तिकची भर मैदानात सहकाऱ्याला शिवीगाळ title=

कोलकाता : आयपीएलच्या एलिमिनेटर मॅचमध्ये हैदराबादनं कोलकात्याचा १४ रननी पराभव केला. हैदराबादचा राशिद खान या विजयाचा शिल्पकार ठरला. राशिद खाननं पहिले बॅटिंग करताना १० बॉलमध्ये ३४ रन केल्या. तर बॉलिंग करताना त्यानं ४ ओव्हरमध्ये १९ रन देऊन ३ विकेट घेतल्या. क्रिस लिन, रॉबिन उथप्पा आणि आंद्रे रसेल या कोलकात्याच्या तीन महत्त्वाच्या विकेट राशिद खाननं घेतल्या. राशिद खाननं या मॅचमध्ये एक रन आऊट आणि दोन कॅचही पकडले. पण या मॅचवेळी कोलकात्याचा कर्णधार दिनेश कार्तिकचं भडकलेलं रुप पाहायला मिळालं. हैदराबादची बॅटिंग सुरु असताना कार्तिकनं कोलकात्याचा बॉलर प्रसिद्ध कृष्णाला शिवीगाळ केली. स्टम्पमध्ये असलेल्या माईकमुळे कार्तिकचा आवाज स्पष्ट ऐकू येत आहे. कार्तिकचा हा व्हिडिओ सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत आहे.

या मॅचमध्ये कोलकात्यानं टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. मॅचची नववी ओव्हर प्रसिद्ध कृष्णानं टाकली. शाकीब अल हसन बॅटिंग करत असताना कृष्णानं ओव्हर थ्रो केला. त्यामुळे भडकलेल्या दिनेश कार्तिकनं कृष्णाला शिवी हासडली. हैदराबादविरुद्धच्या या मॅचमध्ये पराभव झाल्यामुळे कोलकात्याचं आव्हान संपुष्टात आलं. 

पाहा काय म्हणाला दिनेश कार्तिक 

Damn Karthik's got no chill. from r/Cricket