मुंबई : जसा काही वर्षांपूर्वी सचिन तेंडुलकरशिवाय भारतीय क्रिकेट संघ अपूर्ण वाटत होता.
आता क्रिकेटर आणि कर्णधार विराट कोहलीच्या बाबतीतही झालं आहे. भारताचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहली दिवसेंदिवस नवे विक्रम करत आहे.
२००८ साली मात्र एस बद्रीनाथच्या जागी विराट कोहलीच्या निवडीमुळे मात्र भारताचे माजी क्रिकेटर दिलीप वेंगसरकर यांना पदावरून दूर करण्यात आले होते. त्यावेळेस दिलीप वेंगसरकर चीफ सिलेक्टर म्हणून काम पाहत होते. मात्र विराटच्या निवडीमुळे वेंगसरकर आणि बीसीसीआई अध्यक्ष एन श्रीनिवासन यांच्यामध्ये वाद निर्माण झाला होता.
'डेमॉक्रेसी इलेवन ' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याच्या दरम्यान दिलीप वेंगसरकर यांनी ही आठवण सांगितली. विराटच्या निवडीमुळे खूप गोंधळ झाला होता. तत्कालीन बीसीसीआय अध्यक्ष शरद पावारांकडे दिलीप वेंगसरकरांची तक्रार करण्यात आली होती. पुढच्याच दिवशी दिलीप वेंगसरकर यांना पदावरून हटवण्यात आले. पण या निर्णयामुळे विराटचे सिलेक्शन काही थांबवू शकले नाही. असेही वेंगसरकर म्हणाले.