विराटनं मोडलं तेंडुलकर-गांगुलीचं रेकॉर्ड

न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये विराट कोहलीनं 32वी सेंच्युरी झळकावली.

Updated: Oct 29, 2017, 05:35 PM IST
विराटनं मोडलं तेंडुलकर-गांगुलीचं रेकॉर्ड  title=

कानपूर : न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये विराट कोहलीनं 32वी सेंच्युरी झळकावली. कोहलीनं 106 बॉल्समध्ये 113 रन्स केल्या. त्याच्या या खेळीमध्ये 9 फोर आणि एका सिक्सचा समावेश होता.

कानपूरमध्ये झळकावलेल्या या सेंच्युरीबरोबरच विराटनं आणखी एका रेकॉर्डला गवसणी घातली आहे. वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद 9 हजार रन्सचा टप्पा ओलांडण्याचं रेकॉर्ड विराटनं बनवलं आहे. विराटनं 194 इनिंगमध्ये 9 हजार रन्सचा टप्पा पार केला आहे. याआधी हे रेकॉर्ड दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलियर्सच्या नावावर होतं. एबीनं 205 इनिंगमध्ये 9 हजार रन्सचा टप्पा ओलांडला होता. 9 हजार रन्स पूर्ण करायला गांगुलीला 228 इनिंग, सचिन तेंडुलकरला 235 इनिंग आणि ब्रायन लाराला 239 इनिंग लागल्या होत्या.