मुंबई : भारताचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी गेल्या वर्षी इटलीमध्ये विवाह केला. मात्र त्यांच्या मॅरेज लाईफमध्ये एक संकट उभे राहिलेय. विराट आणि अनुष्काच्या लग्नाचे रजिस्ट्रेशन करण्यात अडचणी येतायत.
विराट आणि अनुष्काचे गेल्या वर्षी ११ डिसेंबरला लग्न झाले. मात्र याबाबत त्यांनी रोम येथील भारतीय दूतावासमध्ये याबाबत कोणतीही माहिती दिली नाही. यामुळे त्यांच्या लग्नाच्या रजिस्ट्रेशनमध्ये अडथळे येऊ शकतात.
दरम्यान, विराट आणि अनुष्काला यासाठी एक जुगाड करावा लागेल. या दोघांना पुन्हा लग्न करावे लागेल.
पंजाब आणि हरयाणा हायकोर्टाचे वकील हेमंत कुमार यांच्याकडून आरटीआयअंतर्गंत विराट आणि अनुष्काच्या लग्नाच्या रजिस्ट्रेशनबाबत सवाल उपस्थित करण्यात आलाय. यावर रोम स्थित भारतीय दूतावासाने उत्तर दिलेय.
जर एखादा भारतीय देशाबाहेर लग्न करत असेल तर त्याच्या लग्नाचे रजिस्ट्रेशन परदेशी विवाह अधिनियम-1969 अंतर्गंत होते. दरम्यान या रजिस्ट्रेशनसाठी त्या देशातील भारतीय दूतावासाला याबाबत माहिती देणे गरजेचे असते. विराट आणि अनुष्काकडून ही चूक झालीये.
जाणकारांच्या मते विराट आणि अनुष्काच्या लग्नाचे रजिस्ट्रेशन होण्यासाठी जे अडथळे येतायत त्याचे समाधान राज्य सरकार करु शकते. विराट आणि अनुष्का लग्नानंतर ज्या राज्यात आपला पत्ता निश्चित करतील तेथील रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये त्यांना लग्नाच्या रजिस्ट्रेशनसाठी अर्ज करावा लागेल.
उदाहरणार्थ अनुष्का आणि विराटने मुंबईतील पत्ता निश्चित केला तर महाराष्ट्रातील रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये त्यांना अर्ज करावा लागेल. येथे रजिस्ट्रेशनसाठी विराट आणि अनुष्काला पुन्हा लग्न करावे लागेल. यानंतरच त्यानंतर त्यांच्या लग्नाचे रजिस्ट्रेशन होऊ शकते. रजिस्ट्रेशनसाठी विराट आणि अनुष्काला साक्षीदारांचीही गरज आहे. याशिवाय लग्नाचे फोटो आणि कार्डचीही गरज आहे.