तिरुवनंतपुरम : भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये पाचवी वनडे गुरुवारी खेळवण्यात येणार आहे. या मॅचमध्ये भारताचा क्रिकेटपटू एमएस धोनी दिग्गजांच्या यादीत पोहोचण्यापासून फक्त १ रन दूर आहे. भारताकडून खेळताना वनडेमध्ये १० हजार रन पूर्ण करायला धोनीला फक्त एका रनची आवश्यकता आहे.
धोनीचा खराब फॉर्म वेस्ट इंडिजविरुद्धच्या चौथ्या वनडेमध्येही कायम राहिला. भारताकडून खेळताना धोनीला १० हजार रन पूर्ण करायला धोनीला आणखी १ रनची गरज आहे. वनडे क्रिकेटमध्ये मात्र धोनीनं १० हजार रन पूर्ण केले आहेत. धोनीनं वनडेमध्ये आत्तापर्यंत १०,१७३ रन केले आहेत. २००७ साली आफ्रिका एकादशविरुद्ध आशिया एकादशकडून खेळताना धोनीनं ३ मॅचमध्ये १७४ रन केले होते.
भारताकडून खेळताना धोनीनं आत्तापर्यंत ९,९९९ रन केले आहेत. ब्रेबॉर्न स्टेडियमवर वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या चौथ्या वनडेमध्ये धोनीनं २३ रन केले. यावर्षी वनडे क्रिकेटमध्ये धोनीनं १२ इनिंगमध्ये ६८.१० च्या स्ट्राईक रेटनं २५२ रन केले आहेत.
वनडेमध्ये विराट कोहली, सचिन तेंडुलकर, कुमार संगकारा, रिकी पाँटिंग, सनथ जयसूर्या, महेला जयवर्धने, इंझमाम उल हक, जॅक कॅलिस, सौरव गांगुली, राहुल द्रविड, ब्रायन लारा, तिलकरत्ने दिलशान यांनी १० हजार रन केले आहेत.
सचिन तेंडुलकर- १८,४२६ रन
कुमार संगकारा- १४,२३४ रन
रिकी पाँटिंग- १३,७०४ रन
सनथ जयसूर्या- १३,४३० रन
महेला जयवर्धने- १२,६५० रन
इंझमाम उल हक- ११,७३९ रन
जॅक कॅलिस- ११,५७९ रन
सौरव गांगुली- ११,३६३ रन
राहुल द्रविड- १०,८८९ रन
ब्रायन लारा- १०,४०५ रन
तिलकरत्ने दिलशान- १०,२९०