चॅम्पियन बनल्यानंतर धोनीने वॉट्सनला दिलं नवं नाव

वॉटसनला धोनीने दिलं नवं नाव...

Updated: May 28, 2018, 10:18 PM IST
चॅम्पियन बनल्यानंतर धोनीने वॉट्सनला दिलं नवं नाव title=

मु्ंबई : आयपीएल फायनलमध्ये कर्णधार धोनीच्या नेतृत्वात चेन्नईने हैदराबाद शानदार विजय मिळवला. हैदराबादचा 8 विकेटने पराभव करत चेन्नई तिसऱ्यांदा IPLची चॅम्पियन बनली आहे. चेन्नईने याआधी 2010 आणि 2011 मध्ये देखील हा खिताब जिंकला आहे. 2 वर्षाच्या बंदीनंतर चेन्नईने यंदाच्या सीजनमध्ये पुन्हा प्रवेश केला.

 

Thanks everyone for the support and Mumbai for turning yellow.Shane ‘shocking’ Watson played a shocking innings to get us through.end of a good season.Ziva doesn’t care about the trophy, wants to run on the lawn according to her wordings.

A post shared by M S Dhoni (@mahi7781) on

सामन्यानंतर महेंद्र सिंह धोनीने पत्नी साक्षी आणि मुलगी जिवा सोबतचा एक फोटो शेअर केला आहे. धोनीने फोटो शेअर करत म्हटलं की, 'सगळ्या लोकांना पाठिंबा दिल्याबद्दल धन्यवाद आणि मुंबईला पिवळ्या रंगात रंगवण्यासाठी देखील धन्यवाद...शेन 'शॉकिंग' वॉटसनने हैरान करणारी इनिंग खेळली आणि आम्हाला चॅम्पियन बनवलं. जिवाला आयपीएल ट्रॉफीशी काही देणं घेणं नाही तिला लॉनमध्ये धावायचं आहे.'