धोनीची IPL कारकिर्दीतील सर्वात खराब कामगिरी, कर्णधार म्हणूनही अपयशी

बॅट्समनसह धोनी यंदा कर्णधार म्हणूनही ठरला फ्लॉप

Updated: Nov 1, 2020, 11:12 PM IST
धोनीची IPL कारकिर्दीतील सर्वात खराब कामगिरी, कर्णधार म्हणूनही अपयशी title=
(फोटो-BCCI/IPL)

दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यामुळे या वेळी आयपीएलमध्ये धोनी चांगली कामगिरी करेल. अशी त्याच्या चाहत्यांना आशा होती. मुंबई विरुद्ध पहिल्या सामन्यात विजय मिळवत त्याने याची सुरुवात देखील केली. पण नंतर धोनी आणि संपूर्ण टीमने निराशाजनक कामगिरी केली. ज्यामुळे संघ आयपीएलमधून बाहेर झाला आहे.

11 सीझनमध्ये सीएसकेचा कर्णधार असताना तो पहिल्यांदा आपल्या संघाला प्लेऑफमध्ये पोहोचवू शकला नाही. रैना आणि भज्जीसारख्या खेळाडू संघात नसल्याने हंगाम सुरू होण्यापूर्वी सीएसकेला मोठा धक्का बसला होता. परंतु धोनी काही आश्चर्यकारक कामगिरी करेल याची चाहत्यांना आणि फ्रॅंचायझीला खात्री होती पण तसे झाले नाही. यंदा कर्णधार म्हणून देखील तो अपयशी ठरला.

कर्णधार म्हणून चमत्कार दाखविणारा एमएस फलंदाज म्हणून पूर्णपणे अपयशी ठरला आणि सीजनमध्ये फक्त 200 धावा करू शकला. त्याची सर्वोत्तम धावसंख्या नाबाद 47 अशी होती. 2008 पासून सतत आयपीएल खेळत असलेल्या एमएसने प्रथमच एका हंगामात सर्वात कमी धावा केल्या.

आयपीएलमधील रन 

2008- 414 धावा

2009- 332 धावा

2010- 287 धावा

2011 - 352 धावा

2012- 358 धावा

2013- 461 धावा

2014- 371 धावा

2015- 372 धावा

2016- 284 धावा

2017- 290 धावा

2018- 455 धावा

2019 - 416 धावा

2020 - 200 धावा

महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात आयपीएल सीझन 13 मध्ये शेवटच्या सामन्यात सीएसकेने विजय मिळवला. आयपीएलच्या 53 व्या सामन्यात पंजाबने सीएसकेविरुद्धच्या पहिल्या डावात ओव्हरमध्ये 153 रन केले होते. प्रत्युत्तरात ऋतुराज गायकवाडच्या नाबाद अर्धशतकाच्या बळावर सीएसकेने 19 व्या ओव्हरमध्येच सामना जिंकला.

धोनीच्या चाहत्यांसाठी चांगली बातमी अशी आहे की एमएस धोनीने हे स्पष्ट केले की हा त्यांचा आयपीएलचा शेवटचा हंगाम नव्हता, म्हणजेच सहा महिन्यांनंतर पुढील आयपीएल हंगामात तो खेळताना दिसू शकेल. फ्रॅन्चायझीने देखील हे स्पष्ट केले होते की त्यांना आशा आहे की पुढील हंगामात माही आपल्यासाठी खेळेल, त्यामुळे आता त्याच्या चाहत्याला पुढच्या आयपीएलची प्रतिक्षा असेल.