मुंबई : वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये भारताचा ९३ रन्सनी विजय झाला आहे. भारताच्या या विजयाची शिल्पकार ठरला तो महेंद्रसिंग धोनी. धोनीनं ७९ बॉल्समध्ये ७८ रन्सची खेळी केली, यामध्ये ४ फोर आणि २ सिक्सचा समावेश होता. या मॅच विनिंग खेळीमुळे धोनीला मॅन ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं.
या मॅचमध्ये धोनीनं रेकॉर्डला गवसणी घातली आहे. वनडेमध्ये सर्वाधिक रन बनवणाऱ्या विकेट किपरमध्ये धोनी आता दुसऱ्या क्रमांकावर आहे. धोनीनं ऑस्ट्रेलियाच्या ऍडम गिलख्रिस्टला मागे टाकलं आहे. वनडेमध्ये धोनीच्या आता ९४१४ रन्स आहेत तर गिलख्रिस्टनं वनडेमध्ये ९४१० रन्स बनवल्या आहेत. श्रीलंकेचा माजी विकेट किपर कुमार संगकारा या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. संगकारानं १३,३४१ रन्स बनवल्या आहेत.