...अन् दीपक चहरसाठी धोनी असा बनला लव्ह गुरू!

दीपकने गर्लफ्रेंडला प्रपोज केल्याचं सर्व दुनियेने पाहिलं. मात्र हे सर्व प्लॅनिंग एका खास व्यक्तीचं होतं.

Updated: Oct 9, 2021, 08:50 AM IST
...अन् दीपक चहरसाठी धोनी असा बनला लव्ह गुरू! title=

दुबई : चेन्नई सुपर किंग्जचा गोलंदाज दीपक चहरने पंजाबविरुद्धच्या सामन्यानंतर त्याची गर्लफ्रेंडला प्रपोज केलं. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. प्रत्येकजण त्यांना अभिनंदन करत असून लवकरच ते लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचं दीपकच्या वडिलांनी सांगितलंय. दीपकने गर्लफ्रेंडला प्रपोज केल्याचं सर्व दुनियेने पाहिलं. मात्र हे सर्व प्लॅनिंग एका खास व्यक्तीचं होतं.

चेन्नईचा कर्णधार आणि भारताचा माजी खेळाडू एम.एस धोनीचं हे सर्व प्लॅनिंग असल्याचं आता समोर आलं आहे. दीपकच्या वडिलांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. दीपकच्या वडिलांनी असंही सांगितलं की, चहरला प्लॅन काहीतरी वेगळाच होत, पण त्याने धोनीच्या सांगण्यावरून या प्लॅनमध्ये चेंज केला.

धोनी कसा बनला दीपकचा लव्ह गुरू

धोनीने चहरला त्याच्या मैत्रिणीला प्रपोज करायला मदत केली. चहरला प्रत्यक्षात प्लेऑफ सामन्यांनंतर त्याच्या गर्लफ्रेंडसा प्रपोज करायचं होतं. पण जेव्हा त्याने आपला कर्णधार धोनीला याबाबत माहिती दिली तेव्हा त्याला ही कल्पना आवडली नाही. यानंतर धोनीनने लीग सामने संपल्यानंतर धोनीने चहरला त्याच्या मैत्रिणीला प्रपोज करण्याचा सल्ला दिला.

टी 20 वर्ल्डकपनंतर लग्नाची तारीख ठरणार

दीपकच्या वडिलांनी असंही सांगितलं की, दीपकने गर्लफ्रेंडला प्रपोज करण्यापूर्वी कुटुंबातील सर्व सदस्यांना याबद्दल सांगितलं होतं. सध्या तो IPL मध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळत आहे. यानंतर, तो टी-20 विश्वचषकात भारतीय संघासोबत असेल. त्याचे नाव राखीव खेळाडूंमध्ये समाविष्ट करण्यात आलं आहे. दरम्यान वर्ल्डकप संपल्यानंतर चहर भारतात परत येईल आणि त्यानंतर लग्नाची तारीख निश्चित केली जाणार आहे.