मुंबई : टीम इंडियाची खेळाडू दीप्ती शर्मा नुकत्याच झालेल्या आयसीसी महिला वर्ल्डकपमध्ये वेळोवेळी 'कॅरम बॉल'चा वापर केलेला अनेकांनी पाहिला... पण, गंमत म्हणजे या पद्धतीचं दीप्तीनं कुठंही प्रशिक्षण घेतलेलं नाही... तर ही पद्धत तिनं 'एकलव्या'प्रमाणे एका खेळाडूचे व्हिडिओ पाहून त्यातूनच शिकून घेतलीय.
टीम इंडियाची ऑलराऊंडर खेळाडू असलेल्या दीप्तीनं नुकताच हा खुलासा केलाय. पुरुष टीममधील स्पिनर रविचंद्रन अश्वीनचे व्हिडिओ पाहून आपण 'कॅरम बॉल'चा अभ्यास सुरू केल्याचं दीप्तीनं म्हटलंय. मी नेहमी नेटवर याचा अभ्यास करते. वर्ल्डकपच्या काही मॅचमध्ये मी याचा उपयोग करून पाहिला. बॅटसमनला चकवण्यासाठी याचा चांगला उपयोग होतो, असंही दीप्तीनं म्हटलंय.
मी अजून अश्विनची भेट घेतलेली नाही... संधी मिळाली तर निश्चितच मी त्यांच्याकडून कॅरम बॉलबद्दल चर्चा करेन... असंही दीप्तीनं म्हटलंय.