नवी दिल्ली : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूडची अभिनेत्री अनुष्का शर्मा ११ डिसेंबरला विवाहबद्ध झाले. त्यापुर्वी काहीदिवसांपासून त्यांच्या लग्नाच्या चर्चेला उधाण आले होते. मात्र त्यानंतर ही अफवा असल्याचे समजले. मात्र विराट कोहली आणि अनुष्का शर्माने लग्नानंतर त्याबद्दलची अधिकृत माहिती ट्विटरवरून दिली. त्यानंतर जगभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला.
अजूनही शुभेच्छांचा सिलसिला संपलेला नाही. भारतातून त्यांचे चाहते, क्रिकेट-बॉलिवूड क्षेत्रातील दिग्गजांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. आता दुसऱ्या देशातील क्रिकेटर्स देखील शुभेच्छा देत आहेत. अलीकडेच दक्षिण आफ्रिकेचा धुरंधर फलंदाज एबी डिविलियर्स ने त्यांना शुभेच्छा दिल्या. त्याने एक व्हिडिओ शेअर करून विरूष्काला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर त्यांच्याकडून एक खास मागणी केली.
या व्हिडिओत तो म्हणाला की, विराट आणि अनुष्काला लग्नाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. विराटचे लग्न माझ्यासाठी सरप्राईज होते. तरी देखील हा सरप्राईज प्लॅन कोणाचा आहे मला माहित आहे. तुम्ही दोघं एकत्र खूप खुश राहा. आशा आहे की, तुमच्या घरी लवकरच एक लहान पाहूणा येईल.
डिविलियर्स आणि विराट आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या टीममधून एकत्र खेळायचे. डिविलियर्सव्यतिरिक्त पाकिस्तानी क्रिकेटर मोहम्मद आमिर ने देखील विराटला शुभेच्छा दिल्या आहेत.