CWG 2022 : पीव्ही सिंधूनंतर लक्ष्य सेनची कमाल, भारताच्या खात्यात २० सुवर्णपदके

भारताच्या खात्यात आता २० सुवर्णपदके झाली आहेत

Updated: Aug 8, 2022, 06:10 PM IST
CWG 2022 : पीव्ही सिंधूनंतर लक्ष्य सेनची कमाल, भारताच्या खात्यात २० सुवर्णपदके title=

CWG 2022 : कॉमनवेल्थ क्रिडा स्पर्धेमध्ये भारताची पदकांची लूट सुरुच आहे. भारताच बॅटमिंटन स्टार खेळाडू पीव्ही सिंधूने सुवर्णपदक जिंकल्यानंतर काही वेळातच लक्ष्य सेन यानेही सुवर्णपदक मिळवले आहे.

लक्ष्य सेनने पहिला गेम गमावल्यानंतर दुसऱ्या गेमध्ये जोरदार पुनरागमन केले. लक्ष्यने त्जे यंगला १९-२१.२१-९,२१-१६ अशा फरकाने हरवलं आणि सुवर्णपदक जिंकलं. कॉमनवेल्थ स्पर्धेत भारताचे हे विसावे सुवर्णपदक आहे. तर बॅटमिंटनमध्ये भारताचे हे दुसरे सुवर्णपदक आहे.

याआधी पीव्ही सिंधूने कॉमनवेल्थ स्पर्धेत पहिल्यांदाच एकेरी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकत मोठे यश मिळवले आहे. दोन वेळा ऑलिम्पिक विजेच्या आणि जगातील सातव्या क्रमांकाची खेळाडू असणाऱ्यांना सिंधूने मिशेलचा २१-१५, २१-१३ असा पराभव करत सुवर्णपदक जिंकलं