मुंबई : दिवसेंदिवस काश्मीरचा स्टार खेळाडू उमरान मलिकची कामगिरी उत्तम होत असल्याचं दिसत आहे. अनेक दिग्गजांनी उमरानला टीम इंडियात संधी द्यावी असं म्हटलं आहे.
हैदराबादकडून खेळणाऱ्या बॉलरने एक अनोखा विक्रम आपल्या नावावर केला. यंदाच्या हंगामातील सर्वात लांब बॉल टाकला आहे. उमराननं हा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आणि त्याचं कौतुक होत आहे.
हैदराबादकडून खेळणाऱ्या युवा बॉलरने यंदाच्या हंगामात सर्वात वेगाने बॉल फेकला. या बॉलचा वेग 154 किमी ताशी होता. याआधी त्याने 150 किमी ताशी वेगानं बॉल टाकला होता. चेन्नईच्या 10 व्या ओव्हरमध्ये उमराननं हा पराक्रम केला.
या बॉलचा वेग इतका होता की फलंदाजी करत असलेला ऋतुराजही हैराण झाला. तो थेट कीपरच्या अंगावर गेला. उमरानचं 155 किमी ताशी वेगानं बॉल टाकण्याचं स्वप्न आहे.
उमराननं आणि लॉकी फर्ग्युसन यंदाच्या हंगामातील सर्वात घातक आणि वेगानं बॉल टाकणारे बॉलर्स ठरले. यामुळे बुमराहचं करिअर धोक्यात येणार का? अशी एक चर्चा आहे.