मुंबई : इंडियन प्रीमियर लीगचे तीनदा विजेतेपद जिंकणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जने पुढील मोसमात सिनिअर खेळाडू आणि अष्टपैलू सुरेश रैनाला संघात ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सुरेश रैनाने वैयक्तिक कारणास्तव आयपीएल 2020 मध्ये खेळण्यास नकार दिला होता. सुरेश रैनाचा मॅनेजमेंट सोबत काही तरी वाद असल्याने त्याने नकार दिल्याचं बोललं जात होतं. पण कारण पुढे येऊ शकलं नाही. गेल्या मोसमात रैनाच्या अनुपस्थितीत चेन्नईला चांगली कामगिरी करता आली नाही. एमएस धोनीच्या नेतृत्वात संघ प्रथमच प्लेऑफमध्ये प्रवेश करू शकला नाही.
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये सुरेश रैनाची कामगिरी काही खास नव्हती. तरी देखील सीएसकेने त्याला संघात स्थान दिले आहे. सीएसके व्यवस्थापन धोनीच्या नेतृत्वात संघाला पुन्हा बळकट करण्यासाठी प्रयत्न करीत आहे जेणेकरुन 2021 मध्ये संघ चांगली कामगिरी करू शकेल. सुरेश रैना व्यतिरिक्त सीएसकेने फॉफ डुप्लेसिस आणि ड्वेन ब्राव्हो यांना कायम ठेवले आहे. रवींद्र जडेजा, अंबाती रायुडू, इम्रान ताहिर, शार्दुल ठाकूर, ऋतुराज गायकवाड अशा खेळाडूंनाही कायम ठेवण्यात आले आहे.
सीएसकेने केदार जाधव, मुरली विजय आणि पियुष चावला यांना आयपीएल 2021 हंगामात रिलीज करण्यात आले आहे. या खेळाडूंच्या खराब कामगिरीमुळे त्यांना फ्रँचायझीने वगळले आहे. आता हे खेळाडू पुन्हा आयपीएल 2021 च्या लिलावात भाग घेण्यासाठी मोकळे आहेत.
सीएसके टीम
सुरेश रैना, फॉफ डुप्लेसिस, ड्वेन ब्राव्हो, एमएस, धोनी, एन जगदीशन, ऋतुराज गायकवाड, केएम आसिफ, रवींद्र जडेजा, जोस हेडलवुड, करण शर्मा, अंबाती रायुडू, इम्रान ताहिर, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, मिचेल सॅंटनर, लुंगी नगिडी , सॅम कुरन, एस. किशोर.
केदार जाधव, मुरली विजय, पियुष चावला, हरभजन सिंग, शेन वॉटसन यांना संघातून रिलीज करण्यात आलं आहे.