उत्तरप्रदेश : भारताचा गोलंदाज आरपी सिंग याने सोशल मीडियावर पुन्हा एका क्रिकेटरच्या मदतीसाठी आवाहन केले आहे. आदित्य पाठक या युवा खेळाडूसाठी आरपीसिंगने ऑगस्ट महिन्यातही मदत मागितली होती.
आदित्यची किडनी फेल झाल्याने त्याच्यावर तात्काळ उपचार करणं आवशय्क होतं. त्याच्या उपचारासाठी पैशांची मदत मागण्यासाठी ट्विटरवर आरपी सिंगने आवाहन केले आहे. या आवाहनाला योगी आदित्यनाथांनी प्रतिसाद दिला आहे.
Plz help Aditya Pathak , a young cricketer from UP by donating any amount possible as he is battling his life after a critical kidney transplant at Apollo Hospital Delhi.@BCCI @UPCACricket @YASMinistry
His bank details are below- pic.twitter.com/94rlrT5hmN— R P Singh (@RpSingh99) January 13, 2018
अंडर16 पाली उमरीगर ट्रॉफी खेळल्यानंतर आदित्य पाठकचं भविष्य संकटात आलं होतं. आरपी सिंगने आदित्यला मदत केल्यानंतर इतरांकडेही मदतीचं आवाहन केलं आहे.
आदित्य दिल्लीच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये जीवनमरणाची लढाई लढत आहे.
आरपी सिंगच्या आवाहनानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या ऑफिस ट्विटर हॅन्डलकडून माहिती मागवण्यात आली आहे. शक्य ती मदत करण्याचा प्रयत्न केला जाईल अशी माहिती ट्विटरवर देण्यात आली आहे.
आदित्यवर ऑगस्ट महिन्यात उपचार करण्यात आले होते. मात्र त्यानंतरही त्याच्या प्रकृतीमध्ये फारशी सुधारणा झालेली नाही. आदित्यच्या दोन्ही किडन्या ट्रान्सप्लान्ट करण्याची गरज आहे. त्यासाठी आवश्यक पैसे नसल्याने आदित्यच्या कुटुंबीयांनी घरही गहाण ठेवले आहे.
2009 साली आदित्यची एक किडनी फेल झाली होती. त्यानंतर आदित्यच्या वडिलांनी स्वखर्चाने त्याच्यावर उपचार केले. मात्र आता दुसरीही किडनी फेल झाल्याने तसेच पैशांची चणचण असल्याने त्यांच्या चिंतेत भर पडली आहे.