क्रिकेटर पार्थिव पटेलची सगळ्या फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा

क्रिकेटर पार्थिव पटेलने सगळ्या फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. (Parthiv Patel Announces Retirement )

शैलेश मुसळे | Updated: Dec 9, 2020, 12:02 PM IST
क्रिकेटर पार्थिव पटेलची सगळ्या फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा title=

मुंबई : भारताचा क्रिकेटर पार्थिव पटेलने क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. भारताचा माजी यष्टिरक्षक फलंदाज पार्थिव पटेलने वयाच्या ३५ व्या वर्षी क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. २०१८ मध्ये टीम इंडियाकडून अखेरचा सामना खेळलेला पार्थिव पटेल आता कोणत्याही प्रकारचा क्रिकेट खेळताना दिसणार नाही. (parthiv patel announce retirement)

पार्थिव पटेल याने २००२ मध्ये इंग्लंड दौर्‍यावर वयाच्या १७ व्या वर्षी टीम इंडियाकडून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. यावर्षी आयपीएलमध्ये पार्थिव पटेल आरसीबीचा भाग होता, परंतु त्याला एकही सामना खेळण्याची संधी देण्यात आली नव्हती.

पार्थिव पटेल याने लिहिले की, "आज मी माझ्या १८ वर्षांच्या क्रिकेट कारकीर्दीला निरोप देत आहे. माझ्यावर विश्वास ठेवताना बीसीसीआयने वयाच्या १७ व्या वर्षी मला टीम इंडियाकडून खेळण्याची संधी दिली. बीसीसीआयने ज्या प्रकारे मला सहकार्य केले त्याबद्दल मी नेहमीच आभारी आहे.'

पार्थिव पटेलने आता कुटुंबाला वेळ देण्याचं ठरवलं आहे. त्यामुळे त्याने क्रिकेटला अलविदा म्हटलं आहे. पार्थिव पटेल म्हणतो की, 'तो क्रिकेटर म्हणून जगला आहे. आता त्याला वडील म्हणून काही जबाबदाऱ्या पूर्ण करायच्या आहेत.'  (parthiv patel retirement)