WTC 2023: विजडन वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप संघाची घोषणा, ऋषभ पंतसह 'या' भारतीय खेळाडूंचा समावेश

Wisden World Test Championship Team: विजडनने 2021-2023 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप टीमची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे या संघात गेले काही महिने क्रिकेटपासून दूर असलेल्या विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतला जागा देण्यात आली आहे. 

Updated: Mar 21, 2023, 07:59 PM IST
WTC 2023: विजडन वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप संघाची घोषणा, ऋषभ पंतसह 'या' भारतीय खेळाडूंचा समावेश title=

Wisden World Test Championship playing XI: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 (ICC World Test Championship) चा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान (India vs Australia) खेळवली जाणार आहे. येत्या जून महिन्यात ओव्हल मैदानावर अंतिम फेरीचा सामना खेळवला जाणार आहे. यासाठी दोन्ही संघांची घोषणा अजून व्हायची आहे. पण त्या आधी विजडनने 2021-2023 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप टीमची घोषणा केली आहे. या संघात भारताचा धडाकेबाज फलंदाज आणि विकेटकीपर ऋषभ पंतला (Rishabh Pant) संधी देण्यात आली आहे. पंतशिवाय भारताच्या दोन खेळाडूंची या संघात वर्णी  लागली आहे. 

या तीन भारतीय खेळाडूंना संधी
2021 ते 2023 दरम्यान खेळल्या गेल्या कसोटी सामन्यांतील कामगिरीच्या आधारावर 11 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. गेले काही महिने क्रिकेटपासून दूर असलेल्या ऋषभ पंतचा (Rishabh Pant) या संघात समावेश करण्यात आला आहे. याशिवाय टीम इंडियाचा अष्टपैल रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) यांनाही संधी देण्यात आली आहे. भारताचे स्टार खेळाडू रोहित शर्मा (Rohit Sharma), विराट कोहली (Virat Kohli), केएल राहुल (KL Rahul)यांना या संघात स्थान देण्यात आलेलं नाही.

या देशातील खेळाडूंचा समावेश
टीम इंडियातल्या तीन खेळाडूंना संधी मिळाली आहे, तर ऑस्ट्रेलियाच्या सर्वाधिक 4 खेळाडूंचा या संघात समावेश करण्यात आला आहे. यात 
उस्मान ख्वाजा (Usman Khawaja), मार्नस लाबुशेन (Marnus Labuschagne), पॅट कमिंस (Pat Cummins) आणि नॅथन लियोन (Nathan Lyon) यांची नावं आहेत. याशिवाय श्रीलंकेचा दिमुथ करुणारत्ने (Dimuth Karunaratne) आणि दिनेश चांदीमल Dinesh Chandimal), इंग्लंडचा जॉनी बेयरस्टो (Jonny Bairstow), दक्षिण आफ्रिकेचा कगिसो रबाडा (Kagiso Rabada) यांना अंतिम अकरामध्ये स्थान मिळालं आहे.

7 ते 11 जून WTC फायनल
भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान वर्ल्ड टेस्ट टॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. इंग्लंडच्या ओव्हल मैदानावर 7 ते 11 जून दरम्यान अंतिम सामना रंगणार आहे. वर्ल्ड टेस्ट टॅम्पियनशिपसाठी 7 मे पर्यंत संघाची घोषणा करावी लागणार आहे. टीम इंडियाने सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. पहिल्या स्पर्धेत टीम इंडियाला न्यूझीलंडविरुद्ध पराभव पत्करावा लागला होता.

विजडन वर्ल्ड टेस्ट चँपियनशिप टीम
उस्मान ख्वाजा, दिमुथ करुणारत्ने, मार्नस लाबुशेन, दिनेश चांदीमल, जॉनी बेयरस्टो, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, पॅट कमिंस, जसप्रीत बुमराह, कगिसो रबाडा, नॅथन लियोन.