'विराट कोहली माझ्यावर थुंकला' दिग्गज खेळाडूने केला गंभीर आरोप... क्रिकेट जगतात खळबळ

टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीवर एका खेळाडूने गंभीर आरोप केला असून यामुळे क्रिकेट जगतात खळबळ उडाली आहे. या संदर्भात एक व्हिडिओ व्हायरल झाला असून या व्हिडिओत खेळाडूने विराट कोहलीला आपण बॅटने मारणार होतो असाही खुलासा केला आहे. 

राजीव कासले | Updated: Jan 29, 2024, 06:05 PM IST
'विराट कोहली माझ्यावर थुंकला' दिग्गज खेळाडूने केला गंभीर आरोप... क्रिकेट जगतात खळबळ title=

Dean Elgar on Virat Kohli : दक्षिण आफ्रिकेच्या एका दिग्गज खेळाडूने भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीवर (Virat Kohli) गंभीर आरोप केला आहे. 2015 मध्ये हा खेळाडू आणि विराट कोहलीची पहिल्यांदा भेट झाली. या भेटीत दोघांनी एकमेकांना शिव्या दिल्या. दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू डीन एल्गरने  (Dean Elgar) युट्यूब चॅनेल Betway South Africa ला दिलेल्या मुलाखतीत हे खुलासे केले आहेत. 2015 मध्ये एल्गरचा पहिला भारतीय दौरा होता. यावेळचा एक किस्सा त्याने सांगितला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. 

या व्हिडिओत एल्गरने गंभीरवर धक्कादायक आरोप केला आहे. कोहली आपल्यावर थुंकला होता. यावर पुन्हा असं केल्यास बॅटने मारू अशी धमकी आपण विराट कोहलीला दिल्याचं एल्गरने या व्हिडिओत सांगितलं आहे. 

भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यात आपण खेळपट्टीवर होतो. आर अश्विनच्या गोलंदाजीवर खेळपट्टीवर टिकण्याचं आव्हान होतं. मी एकाग्रता टिवण्याचा प्रयत्न करत असतानाच विराट कोहली आणि रवींद्र जडेजा माझ्यावर थुंकले आणि काही अपशब्द वापरले. मी त्यांना असं न करण्यास बजावलं. विराट कोहलीची भाषा तुला कळली का असा प्रश्न एल्गरला विचारण्यात आला. यावर त्याने आपण आयपीएलमध्ये (IPL) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून (RCB) खेळल्याने आपल्याला काही शब्द माहित असल्याचं एल्गरने सांगितलं. 

विराट कोहलीने अपशब्द वापरल्यानंतर आपणही त्याला याच मैदानावर तुला मारेन अशी धमकी दिली. त्यावर विराट कोहलीने पुन्हा अपशब्द वापरले. आम्ही भारतात खेळत असल्याने थोडं सतर्क राहावं लागत होतं, असही एल्गरने म्हटलंय.  2017-18 मध्ये भारताने दक्षिण आफ्रिका दौरा केला होता. या वेळी ड्रिंक्स ब्रेकदरम्यान विराट कोहलीने आपल्या वर्तुणूकीबाबत माफी मागितली होती. असा खुलासाही एल्गनरने केला.  

श्रेय दिलं नाही
या मुलाखतीत डीन एल्गरने आपल्या भावना व्यक्त केल्या. दक्षिण आफ्रिका क्रिकेटसाठी आपण मोठं योगदान दिलं. पण आपल्याला कधीच श्रेय देण्यात आलं नाही. असं एल्गरने म्हटलंय. 

काफी शानदार है एल्गर का इंटरनेशनल रिकॉर्ड
36 वर्षांचा डीन एल्गर दक्षिण आफ्रिकेसाठी 86 आंतरराष्ट्रीय कसोटी सामने खेळला. यात त्याने  37.92च्या अॅव्हरेजने 5347 धावा केल्या. कसोटी क्रिकेटमध्ये एल्गरच्या नावावर 14 शतकं आणि 23 अर्धशतकांचा समावेश आहे. याशिवाय एल्ग्र दक्षिण आफ्रिकेसाठी 8 एकदिवसीय सामनेही खेळलाय. यात त्याच्या नावावर 104 धावा जमा आहेत. एल्गनरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 17 विकेटही घेतल्या आहेत.