IND vs NZ 2nd ODI: सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) सध्याच्या घडीला भन्नाट फॉर्ममध्ये असल्याचं दिसत आहे. श्रीलंकेविरुद्धच्या टी-ट्वेंटी मालिकेत त्यानं खणखणीत शतकही (Suryakumar Yadav Century) झळकावलं. पण हे शतक झळकावल्यावर त्याला भारताच्या संघातून डच्चू देण्यात आला आणि श्रीलंकेच्या पहिल्या वनडे सामन्यात त्याला संघाबाहेर ठेवण्यात आलं. त्यानंतर आता त्याला पुन्हा न्यूझीलंडविरुद्ध (India Vs New zealand) संधी देण्यात आली आहे. त्यामुळे आता न्यूझीलंड सारख्या तगड्या संघाविरुद्ध सूर्या आपली कमाल दाखवेल, अशी शक्यता आता वर्तविण्यात येत आहे. (cricket suryakumar yadav fails to score runs in odi again may lose wc 2023 team india place latest marathi news)
सूर्याला न्यूझीलंडविरुद्ध चांगली कामगिरी करता आली नाही. अशातच आता सूर्यकुमारने स्वत:च्या पायावर कुऱ्हाड मारल्याचं पहायला मिळतंय. वर्षाच्या सुरुवातीला श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी न दिल्याने सतत प्रश्न उपस्थित केले जात होते. मात्र, आता संधी मिळून देखील सूर्या वनडेमध्ये (Suryakumar Yadav ODI Record) झटपट बाद होताना दिसतोय.
सूर्याने श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात केवळ 4 धावा केल्या होत्या. तर आता न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वनडेत त्याला फक्त 31 धावा करता आल्या. श्रेयस अय्यर (shreyas iyer) दुखापतीमुळे मालिकेबाहेर असल्याने सूर्याची प्लेईंग इलेव्हनमध्ये जागा निश्चित करण्यात आली आहे. आत्ताच सूर्याने चांगली कामगिरी केली तर त्याला आगामी वर्ल्ड कपमध्ये (2023 World Cup ODI) संधी मिळण्याची शक्यता आहे. मात्र, संधीचं सोनं न केल्याने सध्या सूर्यावर चाहते नाराज असल्याचं समजतंय.
आणखी वाचा - विराटने हळूच येऊन मला सांगितलं...; विजयानंतर Shardul Thakur चा कोहलीबाबत मोठा खुलासा
दरम्यान, सूर्याने आत्तापर्यंत 18 एकदिवसीय सामने (ODI) खेळले आहेत. त्यात सुर्याला फक्त 419 धावा करता आल्या आहेत. यामध्ये 29.93 च्या सरासरीने त्याने धावा केल्यात. 18 सामन्यात त्याला फक्त 2 वेळा अर्धशतक करता आलं. त्यामुळे त्याला मोठी खेळी देखील खेळता आली नाही. त्यामुळे आता वनडे वर्ल्ड कपसाठी बीसीसीआय (BCCI) सूर्याच्या बाबतीत कोणता निर्णय घेणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.