भावा-बहिणीचं अतुट नातं! पाठवणीच्यावेळी धायमोकलून रडला हा क्रिकेटपटू... Video व्हायरल

Viral Video: एका क्रिकेटपटूच्या बहिणीच्या लग्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. बहिणीच्या पाठवणीच्यावेळी या क्रिकेटपटूला अश्रु अनावर झाले. बहिण-भावाच्या अतुट नात्याचा हा क्षण पाहून सर्वच जण भावूक झालेत.

राजीव कासले | Updated: Aug 26, 2023, 05:58 PM IST
भावा-बहिणीचं अतुट नातं! पाठवणीच्यावेळी धायमोकलून रडला हा क्रिकेटपटू... Video व्हायरल title=

Wanindu Hasaranga Emotional Viral Video : येत्या 30 ऑगस्टपासून एशिया कप स्पर्धेला  (Asia Cup 20323) सुरुवात होणार आहे. ही स्पर्धा हायब्रिड मॉडेलवर खेळवली जाणार असून काही सामने पाकिस्तान (Pakistan) तर काही सामने श्रीलंकेत (Sri Lanka) खेळवले जाणार आहेत. यावेळी एकदिवसीय फॉर्मेटमध्ये ही स्पर्धा रंगणार आहे. यादरम्यान श्रीलंकेच्या एका खेळाडूचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

बहिणीच्या लग्नात भावूक
श्रीलंकेचा स्टार क्रिकेटपटू वानिंदू हसरंगाचा (Wanindu Hasaranga) एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत वानिंदू हसरंगा भावूक झालेला दिसतोय. आपल्या नेतृत्वाखााली श्रीलंकेाल प्रीमिअर लीग जिंकून देणाऱ्या वानिंदू हसरंगाचा इमोशन व्हिडिओ चांगलाच चर्चेत आहे. बहिण-भावाच्या अतुट नात्याचा हा क्षण पाहून सर्वच जण भावूक झालेत. बहिणीच्या पाठवणीच्यावेळी हसरंगाला अश्रू आवरणं कठिण झालं आणि सर्वांसमोरच तो धायमोकलून रडू लागला. त्याच्या बहिणींनेही यावेळी त्याला मिठी मारून अश्रूंना वाट मोकळी करुन दिली. 

26 वर्षांच्या हसरंगाचा हा व्हिडिओ प्रत्येकाला इमोशनला करणारा आहे. पाठवणीच्या वेळी बहिण भाऊ हसरंगाच्या पाया पडताना दिसत आहे. त्यानंतर दोघं बहिण-भाऊ एकमेकांना मिठी मारून रडताना दिसत आहेत. आसपासच्या लोकांनी हा भावूक करणारा क्षण आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आहेत. यातला एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

हसरंगाची क्रिकेट कारकिर्द
वानिंदू हसरंगा श्रीलंका क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू आहे. त्याने आतापर्यंत 4 कसोटी, 48 एकदिवसीय आणि 58 टी20 सामन्यात संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने एका अर्धशतकासह 196 धावा केल्या आहेत. तर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात 4 अर्धशतकांसह 832 धावा केल्या आहेत. टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 533 धावा त्याच्या नावावर आहेत. 

गोलंदाजीतही हसरंगाने दमदार कामगिरी केली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये 4, एकदिवसीय क्रिकेटमध्ये 67  तर टी20 क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 91 विकेट जमा आहेत. 

एशिया कप विजेते संघ
टीम इंडिया (Team India) एशिया कप स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ आहे. भारतानं आतापर्यंत सर्वाधिक वेळा म्हणजेच सात वेळा एशिया कपचं जेतेपद पटकावलं आहे.  त्यानंतर श्रीलंकेच्या संघानं सहा वेळा एशिया कप स्पर्धा जिंकलीय. या यादीत पाकिस्तानचा संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे, त्यांना दोन वेळा एशिया कपचं जेतेपद जिंकता आलं आहे.