ICC Awards : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीकडून वर्ष 2023 साठीचे पुरस्कार जाहीर केले जातायत. 2023 टी20 क्रिकेटर ऑफ द इयरचा पुरस्कार सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) पटकावला. त्यानंतर आता आणखी एका भारतीय क्रिकेटपटून आयसीसी पुरस्कारांमध्ये (ICc Award) बाजी मारली आहे. भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीला (Virat Kohli) वन डे क्रिकेटर ऑफ द इयर 2023 (ICC Men’s ODI Cricketer of the Year) चा पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराच्या शर्यतीत मोहम्मद शमी आमि शुभमन गिल आणि न्यूझीलंडच्या डेरिल मिचेलचा समावेश होता. पण विराट कोहलीने या सर्वांना मागे टाकलं आहे.
चौथ्यांदा पुरस्काराचा मानकरी
विराट कोहली चौथ्यांदा वन डे क्रिकेटर ऑफ द इ्अरचा मानकरी ठरला आहे. याआधी त्याने 2012, 2017 आणि 2018 मध्ये हा पुरस्कार पटकावला होता. आयसीसीचा वन डे क्रिकेटर ऑफ द इअरचा सर्वाधिक वेळा पुरस्कार पटकावणारा विराट कोहली हा एकमेक क्रिकेटपटू आहे. कोहलीने दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिविलिअर्स तीन वेळा या पुरस्काराचा मानकरी ठरला होता.
2023 मध्ये विराटची कामगिरी
वर्ष 2023 मध्ये विराट कोहली 27 एकदिवसीय सामने खेळला. यात त्याने 1377 केल्या. या वर्षात विराट कोहलीने तब्बल 6 शतकं आणि 8 अर्धशतकं ठोकली.
उस्मान ख्वाजा कसोटीचा बादशाह
ऑस्ट्रेलियाचा हुमकी एक्का उस्मान ख्वाजा (Usman Khwaja) 2023 वर्षातील टेस्ट क्रिकेटर ऑफ द इअरचा मानकरी ठरला होता. या शर्यतीत भारताचा आर अश्विन, इंग्लंड संघाचा स्टार फलंदाज जो रुट आणि ऑस्ट्रेलियाचा ट्रेव्हिस हेड यांचा समावेश होता. आयसीसी मेन्स टेस्ट क्रिकेट ऑफ द इअर पुरस्कार पटकावणारा उस्मान ख्वाजा हा ऑस्ट्रेलियाचा सहावा खेळाडू ठरला आहे. याआधी रिकी पोंटिंग (2006), मायकल क्लार्क (2013), मिचेल जॉनसन (2014), स्टीव्ह स्मिथ (2015) आणि पॅट कमिन्स (2019) यांनी हा पुरस्कार जिंकला आहे.
वर्ष 2023 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये उस्मान ख्वाजाने 13 सामन्यात 1210 धावा केल्या आहेत. यात 3 शतक आणि 6 अर्धशतकांचा समावेश आहे. उस्मान ख्वाजाचा जन्म 18 डिसेंबर 1986 मध्य पाकिस्तनच्या इस्लामाबादमध्ये झाला. पाच वर्षांचा असातना उस्मान ख्वाजा आई-वडिलांबरोबर ऑस्ट्रेलियात आला. उस्मान ख्वाजाचे वडील तारीक ख्वाजा पाकिस्तानात क्लब क्रिकेटर होते.