मुंबई: एका ओव्हरमध्ये चार ते पाच विकेट्स IPLमध्ये हर्षल पटेलनं सुरुवातीच्या सामन्यांमध्ये काढल्या होत्या. बरेच गोलंदाज 4 विकेट्स काढतात पण ऑफ स्पिनर असलेल्या गोलंदाजाने एका सामन्यात 9 विकेट्स काढल्या आहेत. ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटलं ना? या ऑफ स्पिनर गोलंदाजानं क्रिकेट विश्वाला आपल्या गोलंदाजीनं थक्क केलं आहे.
इंग्लंडमध्ये सध्या काउंटी चॅम्पियनशिप 2021चे रोमांचक सामने सुरू आहेत. यावेळी दक्षिण अफ्रिकेच्या खेळाडूचा मैदानात जलवा पाहायला मिळाला. सिमोन हार्मर असं या खेळाडूचं नाव आहे. त्याची गोलंदाजी पाहून सर्वजण हैराण झाले आहेत. ऑफ स्पिनर सिमोन हार्मरने डर्बीशायर विरुद्ध 9 फलंदाजांना तंबुत धाडलं आहे. एकट्या सिमोननं ही कामगिरी फत्ते केली. 80 धावा देऊन 9 विकेट्स काढणाऱ्या या गोलंदाजाचं कौतुक होत आहे.
Simon Harmer's career-best first-class figures of 9/80 surely made him the of Day 3, right?
Enjoy the day's highlights here #LVCountyChamp
LV Insurance County Championship (@CountyChamp) May 15, 2021
सिमोन हार्मरच्या तुफान फलंदाजीसमोर विरुद्ध संघाला नमतं घ्यावं लागलं. संघातील खेळाडू केवळ 146 धावा जेमतेम करू शकले. दुसऱ्या डावातही विशेष कामगिरी करण्यात त्यांना यश मिळालं नाही. हार्मरने पुन्हा दुसऱ्या सामन्यात 3 विकेट्स घेतल्या. त्याने केलेल्या या अनोख्या गोलंदाजीमुळे सर्वजण हैराण झाले आहेत. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.