Corona : शोएब अख्तर पुन्हा ट्रोल, लॉकडाऊनमध्ये पाकिस्तानच्या रस्त्यावर सायकल सफारी

कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारताप्रमाणेच पाकिस्तानमध्येही लॉकडाऊन करण्यात आलं आहे. 

Updated: Apr 12, 2020, 05:10 PM IST
Corona : शोएब अख्तर पुन्हा ट्रोल, लॉकडाऊनमध्ये पाकिस्तानच्या रस्त्यावर सायकल सफारी title=

इस्लामाबाद : कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारताप्रमाणेच पाकिस्तानमध्येही लॉकडाऊन करण्यात आलं आहे. पण लॉकडाऊनमध्येही रस्त्यावर सायकल चालवल्यामुळे पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर ट्रोल झाला आहे. पाकिस्तानची राजधानी असलेल्या इस्लामाबादमध्ये रात्रीच्यावेळी शोएब सायकल चालवत होता. इन्स्टाग्रामवर शोएब अख्तरने याचा व्हिडिओ शेयर केला आहे. शोएबच्या या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट बॉक्समध्ये टीका केली आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Cycling in my beautiful city. Lovely weather. Empty roads. Best work out. #islamabad #pakistan

A post shared by Shoaib Akhtar (@imshoaibakhtar) on

'माझ्या सुंदर शहरात सायकल चालवत आहे. हवामान चांगलं आहे, रस्त्यावरही कोणी नाही. मस्त व्यायाम होतोय,' असं कॅप्शन शोएब अख्तरने या पोस्टला दिलं आहे. 

भारत-पाकिस्तान यांच्यामध्ये ३ वनडे मॅचची सीरिज खेळवा आणि या मॅचमधून मिळणारी रक्कम कोरोनाशी लढण्यासाठीचा निधी म्हणून दोन्ही देशांनी वापरावी, असा प्रस्ताव शोएब अख्तरने ठेवला होता. शोएबच्या या प्रस्तावावर अनेकांनी टीका केली होती. भारताकडे बराच पैसा आहे, आम्हाला पैशांची गरज नाही, असं प्रत्युत्तर माजी क्रिकेटपटू कपिल देव यांनी दिलं होतं. 

परिस्थिती लवकर चांगली होईल, असं सध्यातरी दिसत नाही, त्यामुळे अशा स्थितीत खेळाडूंचा जीव धोक्यात घालणं चुकीचं ठरेल, असं कपिल देव म्हणाले होते.