मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा इग्लंड कसोटी सामन्यापूर्वी कोरोना पॉझिटीव्ह आढळून आला आहे. रोहित शर्मा पॉझिटीव्ह आढळल्यामुळे इग्लंड कसोटी सामन्यावर कोरोनाचे सावट पसरले आहे.त्यामुळे आता बीसीसीआय (BCCI) आणि इंग्लंड क्रिकेट बोर्ड (ECB) ने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे क्रिकेट चाहत्यांची मोठी निराशा झाली आहे.
रोहित शर्माला कोरोनाची लागण झाल्यानंतर दोन्ही संघांच्या क्रिकेट बोर्डांनी हालचाली सुरू केल्या आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रोहित शर्मा कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे आता संपूर्ण भारतीय संघाची कोरोना चाचणी होणार आहे. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने इनसाइड स्पोर्टला सांगितले की, रविवारी आणि सोमवारी सकाळी संपूर्ण भारतीय संघाची कोरोना चाचणी होईल.
कर्णधार आणि सलामीचा मोठा प्रश्न
रोहित शर्मा कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर संघाच्या अडचणीत वाढ झाली आहे. या मोठ्या कसोटी सामन्यात रोहित शर्माच्या खेळावर आता सस्पेन्स कायम आहे. रोहितशिवाय सलामीवीर केएल राहुल देखील संघाचा भाग नाही, त्यामुळे शुभमन गिल सलामीवीर म्हणून डावाची सुरुवात कोण करणार हाही संघासमोर मोठा प्रश्न आहे. तसेच संघाचे कर्णधार पदी कोण असणार हाही मोठा प्रश्न आहे. विराट कोहली अथवा रीषभ पंत या दोन खेळाडूंकडे कर्णधार पद जाण्याची शक्यता आहे.
रोहित शर्मा आयसोलेट
रोहित शर्मा सध्या हॉटेलमध्ये आयसोलेशनमध्ये आहे. वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली त्याला ठेवण्यात आले आहे. दरम्यान टीम मीटिंगमध्ये रोहित शर्मा राहुल द्रविड आणि जसप्रीत बुमराहच्या अगदी जवळ उभा होता. लेस्टरशायरविरुद्ध खेळल्या जात असलेल्या सराव सामन्यात रोहित शर्माही संघाचा भाग होता. त्यामुळे इतर खेळाडू पॉझिटीव्ह सापडण्याचा धोका वाढला आहे.