नवी दिल्ली : कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारतीय खेळाडू खूपच चांगलीच कामगिरी करतायत. या खेळाडूंच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे भारताच्या खात्यात अनेक पदकांची संख्या वाढत आहे. पदकांच्या गुणतालिकेतही भारत चांगल्या स्थानी आहे.एकूणच काय तर खेळाडूंच्या कामगिरीवर संपूर्ण भारताला गर्व आहे.
कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये भारतासोबतच इतर अनेक देशही चमकदार कामगिरी करत आहे. या दरम्यान स्पर्धेतला एक फोटो प्रचंड व्हायरल होत आहे.या फोटोत दीर आणि वहिनी मेडलमध्ये पोझ देताना दिसत आहे.त्यामुळे हे चर्चेत आलेले दीर आणि वहिनी आहेत तरी कोण अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.
क्रिकेटशी खास कनेक्शन
कॉमनवेल्थ गेम्समध्ये दीर- वहिनीने पदक पटकावली आहेत. ऑस्ट्रेलियच्या अॅलिसा हिलीने सुवर्णपदक पटकावले आहे तर ब्रेंडन स्टार्कने रौप्य पदक पटकावली आहेत. त्यामुळे या दीर- वहिनीच्या स्पर्धेतील कामगिरीची आणि फोटोची चर्चा रंगली आहे.
ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने क्रिकेट सामन्याचा अंतिम सामना जिंकत सुवर्णपदक पटकावले आहे. या संघात अॅलिसा हिलीचा समावेश होता. अॅलिसा हिली ही वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कची पत्नी आहे.
स्टार्कचा धाकटा भाऊ ब्रेंडन स्टार्कने कॉमनवेल्थ गेम्समध्ये भाग घेतला होता. ब्रेंडनने अॅथलेटिक्स उंच उडी स्पर्धेत रौप्यपदक पटकावले आहे. त्याने 2.25 मीटर उडी घेत पदकावर
नाव कोरले आहे.
गुणतालिका
ऑस्ट्रेलियन संघ 10 व्या दिवसअखेरपर्यंत पदकतालिकेत अव्वल स्थानावर राहिला. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत 66 सुवर्ण, 5 रौप्य आणि 53 कांस्य पदके जिंकली आहेत. ऑस्ट्रेलियानंतर इंग्लंड पदकतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 55 सुवर्ण, 59 रौप्य आणि 52 कांस्य पदके जिंकली आहेत. अशाप्रकारे इंग्लंडच्या खात्यात एकूण 166 पदके आहेत. या बाबतीत भारत पाचव्या स्थानावर आहे. टीम इंडियाने 18 सुवर्णपदके जिंकली आहेत. यासह त्याने 15 रौप्य आणि 22 कांस्यपदके जिंकली आहेत. 10 व्या दिवसापर्यंत भारताला एकूण 55 पदके मिळाली आहेत.