धोनीवरील ‘ते’ वक्तव्य सिलेक्टर प्रसादना पडलं महागात, चाहत्यांकडून ट्रोल

टीम इंडियाच्या निवड समितीचे मुख्य अधिकारी एमएसके प्रसाद यांना माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी याच्या निवडीवर केलेलं वक्तव्य चांगलंच महागात पडलं आहे.

Updated: Aug 16, 2017, 12:24 PM IST
धोनीवरील ‘ते’ वक्तव्य सिलेक्टर प्रसादना पडलं महागात, चाहत्यांकडून ट्रोल title=

नवी दिल्ली : टीम इंडियाच्या निवड समितीचे मुख्य अधिकारी एमएसके प्रसाद यांना माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी याच्या निवडीवर केलेलं वक्तव्य चांगलंच महागात पडलं आहे.

एमएसके प्रसाद यांनी सोमवारी म्हणाले होते की, धोनीच्या भविष्यावर निवडी समितीच्या बैठकीत चर्चा झाली. मात्र, त्याचा परफॉर्मन्स सुधारला नाही तरच त्याला पर्याय शोधला जाईल. ते म्हणाले होते की, ‘मी इमानदारीने सांगतो की, चर्चा प्रत्येकाचीच होते. असं नाही की केवळ महेंद्र सिंह धोनीबाबतच चर्चा झाली. जेव्हा आम्ही टीम निवडतो तेव्हा सर्वच बाबींचा विचार करतो. आम्ही प्रत्येकाच्याच बाबतीत चर्चा करतो’.

धोनीवर त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे ट्रोलरनी त्यांना चांगलेच धारेवर धरले आहे. ट्विटरवर त्यांनी धोनीच्या फॅन्सकडून टीकेचा सामना करावा लागत आहे. धोनीच्या अनेक रेकॉर्डच्या आकडेवारीसहीत प्रसाद यांच्यावर आगपाखड केली जात आहे. 

एक यूजरने लिहिले की, ‘एक व्यक्ती ज्याने केवळ ६ टेस्ट सामने आणि १७ ODI खेळले आहे, तो धोनी, युवराज आणि रैनाचं भविष्य ठरवणार’.

दरम्यान, धोनीवर प्रसाद यांनी केलेल्या वक्तव्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये संपात आहे. प्रसाद म्हणाले होते की, धोनीच्या भविष्यावर निवड समितीच्या बैठकीत चर्चा झाली. जर त्याने चांगले प्रदर्शन नाही केले तर त्याला पर्याय शोधला जाईल. 

त्यासोबतच ते पुढे म्हणाले होते की, ‘आम्हा सर्वांना असं वाटतं की, टीम इंडियाने चांगलं प्रदर्शन करावं. जर तो चांगलं प्रदर्शन करत आहे तर का नाही त्याला निवडणार? जर प्रदर्शन चांगलं नसेल तर त्याला पर्यायी खेळाडू शोधला जाईल’.