चेन्नईने विजयासह बनवला हा अनोखा रेकॉर्ड, या स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलंय हे

चेन्नईने कोलकाताविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवताना नवा इतिहास रचलाय. 

Updated: Apr 11, 2018, 11:59 AM IST
चेन्नईने विजयासह बनवला हा अनोखा रेकॉर्ड, या स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलंय हे title=

मुंबई : चेन्नईने मंगळवारी चेपॉक स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या कोलकाताविरुद्धच्या सामन्यात शानदार विजय मिळवला. २०३ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या चेन्नईची सुरुवात चांगली झाली मात्र त्यानंतर चेन्नईचा डाव अडखळला. अखेरच्या चेंडूवर रवींद्र जडेजाने शानदार षटकार ठोकताना संघाला विजय मिळवून दिला. 

यासोबतच या स्पर्धेत नवा इतिहास रचला गेला. आतापर्यंतच्या या स्पर्धेच्या सीझनमध्ये ५ सामने खेळवण्यात आले. या पाचही सामन्यांत दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघांनी सामने जिंकलेत. याआधी २०१६च्या हंगामाच्या सुरुवातीला सलग तीन सामन्यांमत दुसऱ्या डावात फलंदाजी करणारे संघ जिंकले होते. 

आतापर्यंतच्या सामन्यांमध्ये कोण विजयी 

पहिला सामना - मुंबई विरुद्ध चेन्नई - चेन्नईचा 1 विकेट राखून विजय. (दुसरा डाव)

दुसरा सामना - पंजाब विरुद्ध दिल्ली - पंजाबचा ६ विकेट राखून विजय (दुसरा डाव)

तिसरा सामना - कोलकाता विरुद्ध बेंगलुरु - कोलकाता 4 विकेट राखून विजयी (दुसरा डाव)

चौथा सामना - हैदराबाद विरुद्ध राजस्थान - हैदराबादचा ९ विकेट राखऊन विजय(दुसरा डाव)

पाचवां सामना - कोलकाता विरुद्ध चेन्नई - चेन्नई 5 विकेट राखून विजयी(दुसरा डाव)

मंगळवारी झालेल्या या सामन्यात कोलकाताने टॉस हरल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजी करताना २० षटकांत ६ विकेट गमावताना २०२ धावा केल्या आणि चेन्नईसमोर २०३ धावांचे आव्हान ठेवले होते. चेन्नईने हे आव्हान एक चेंडू राखत आणि ५ विकेट गमावताना पूर्ण केले.