प्रिती झिंटाच्या टीमसोबत चिटिंग, अम्पायरला भिडले ३ खेळाडू
खेळाच्या मैदानात अनेकदा खेळाडू अम्पायरला भिडताना दिसतात. असाच एक प्रसंग 'आयपीएल ११' च्या १८ व्या मॅचमध्ये पाहायला मिळाला.
Updated: Apr 21, 2018, 07:39 PM IST
नवी दिल्ली : खेळाच्या मैदानात अनेकदा खेळाडू अम्पायरला भिडताना दिसतात. असाच एक प्रसंग 'आयपीएल ११' च्या १८ व्या मॅचमध्ये पाहायला मिळाला. ईडन गार्डनवर कोलकाता आणि पंजाबचा संघ एकमेकांना भिडतोय. दरम्यान अम्पायरच्या एका निर्णयानंतर पंजाबचे खेळाडू भडकले आणि अम्पायरशी भांडायला लागले. एंड्र्यू टायच्या एका बॉवर अम्पायरने पायाचा नो बॉल दिल्यानंतर वाद सुरू झाला. सहाव्या ओव्हरमध्ये एंड्र्यू टायच्या पहिल्या ओव्हरचा पहिला बॉल अम्पायर ने 'नो बॉल' घोषित केला. टाय चा पाय क्रिजच्या बाहेर असल्याचे अम्पायरला वाटले.
प्लेयर्समध्ये नाराजी
पण रिप्ले बघितल्यावर कळाल की त्याच्या पायाचा मागचा भाग लाईनवरच होता. त्यानंतर बॉलर टायने अम्पायरकडे विचारणा केली. पंजाबचा कॅप्टन आश्विननेही अम्पायरकडे तक्रार करु लागला. दरम्यान युवराज सिंहदेखील रागात दिसला. कॉमेंट्री करणाऱ्या माजी खेळाडूंनीही या घटनेची निंदा केली. जर मैदानावरील मोठ्या स्क्रीनवर नो बॉल नसल्याचे स्पष्ट दिसतेय तर अम्पायरला आपला निर्णय बदलायला हवा, असे त्यांचे म्हणणे होते. पण अम्पायरने हा निर्णय बदलला नाही आणि कोलकाताच्या संघाला फ्री हिट मिळाली.
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.